पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकते मारूतीची ही नवी शानदार कार

मारूती सुझुकी या उत्सवाच्या सीझनमध्ये नवीन धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी पुढील महिन्यात त्यांच्या दमदार सेलेरिओ कारचा नवा अवतार क्रॉसओवर लॉन्च करणार आहे.

Updated: Sep 28, 2017, 04:39 PM IST
पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकते मारूतीची ही नवी शानदार कार title=

नवी दिल्‍ली : मारूती सुझुकी या उत्सवाच्या सीझनमध्ये नवीन धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी पुढील महिन्यात त्यांच्या दमदार सेलेरिओ कारचा नवा अवतार क्रॉसओवर लॉन्च करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ४ ऑक्टोबरला नवीन सेलेरिओ भारतीय बाजारात उतरवणार आहे. या कारचं नाव सेलेरिओ एक्स असेल. सेलेरिओ ही मारूतीची सर्वाधिक विकल्या जाणा-या कारपैकी एक आहे. कंपनीने या कारवर अनेक प्रयोग केले आहेत. कंपनीची ही पहिली ऑटोमॅटिक हॅचबॅक होती. तसेच कंपनीने ही कार छोट्या डिझल इंजिनसोबत बाजारात आणली होती. 

पुढील महिन्यात बाजारात येणारे सेलेरिओ आपल्या सेगमेंटची देशातील पहिली क्रॉसओव्हर हॅचबॅक कार असेल. याआधी टोयोटा इटियॉस क्रॉस, हुंद्यई आय२० अ‍ॅक्टीव्ह आणि फिएट एवेंचुरा क्रॉसओव्हर हॅचबॅक रूपात लॉन्च झाल्या आहेत. असे मानले जात आहे की, या गाड्यांपेक्षा सेलेरिओ क्रॉसची किंमत खूप कमी असेल. 

स्टायलिंगबाबत सांगायचं तर या कारमध्ये चारही बाजूंनी प्लॅस्टिक क्लॅडींग देण्यात आलंय. यासोबतच साईट स्कर्ट आणि व्हील आर्कसोबत नवीन बंपर देण्यात आलंय. सोबतच क्रॉसओव्हर लूक देण्यासाठी यात नवीन व्हील देण्यात आलेत.
 
सेलेरिओच्या इंजिन स्पेशिफिकेशनबाबत सांगायचं तर कंपनीने यात ९९८ सीसीचं ३ सिलेंडर आणि ४ व्हॉल्व असलेले के१०बी इंजिन दिलंय. हे इंजिन ६००० आरपीएम ५० किलोवॉटची पावर जनरेट करतं. तेच याचा टार्क ३५०० आरपीएम वर ९० न्यूटन मीटरचा आहे. कंपनी ही कार ऑटो गिअर शिफ्ट आणि मॅन्युअल ट्रान्समिशन दोन्ही प्रकारात तयार केलं आहे.