Maruti Swift Car Loan Emi: भारतात सर्वाधिक विक्री होणारी फॅमिली कारमधील एक म्हणजे स्विफ्ट (Maruti Swift) ही आहे. ही कार तिच्या शानदार लुक्स, फिचर्स आणि कमाल मायलेजमुळं विक्रीत वाढ झाली आहे. तुम्हालाही मारुती स्विफ्ट घ्यायचीये पण बजेट कमी आहे. तर आज आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. कार घेण्यासाठी तुम्हाला EMI हा देखील एक पर्याय आहे. आज मारुतीच्या स्विफ्टच्या बेस मॉडल आणि टॉप सेलिंग मॉडलवर अनेक डिस्काउंट व कार लोन मिळतात. जर तुम्ही कार लोनवर घेत असाल तर डाउनपेमेंटसह ईएमआयसोबतच व्याजदराच्या बाबत जाणून घ्या.
मारुती सुझुकी स्विफ्ट तुम्हाला एक लाख रुपयांचे डाउनपेमेंट करुनही घेऊ शकता. यानंतर तुम्ही काही वर्षांनंतर एक ठराविक रक्कम देऊन महिन्याला ती भरावी लागेल. सध्या बाजारात स्विफ्ट LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या एकूण 11 व्हेरियंटमध्ये विक्री केली जाते. स्विफ्टची एक्स शोरुम 5.99 लाख रुपयांहून 9.03 लाख रुपये आहे. या हॅचबॅकमध्ये 1197 CC पेट्रोल इंजिन आहे. स्विफ्ट सीएनजीच्या पर्यायात उपलब्ध आहे. मॅनुअलसोबतही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायातही उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी स्विफ्टचे मायलेज 22.56 kmpl पासून 30.90 Km/kg पर्यंत आहे.
मारुती स्विफ्ट एलएक्सआयची किंमत, लोन, डाउनपेमेंट आणि ईएमआयबाबत सांगण्याआधी पाहूयात की बेस व्हेरियंट स्विफ्ट एलएक्सची एक्स शोरुम किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 6,58,244 रुपये आहे. जर तुम्ही एक लाख रुपये डाउनपेमेंट करताय आणि 9 टक्के व्याजदराने 5,58,244 रुपये कार लोन घ्यावे लागेल. जर तुम्ही पाच वर्षांसाठी लोन घेत असाल तर महिन्याला 11,588 रुपयांचे ईएमआय तुम्हाला द्यावा लागेल. स्विफ्टच्या या बेस मॉडेलला फायनान्स करतेवेळी 5 वर्षांत तुम्हाला 1.37 लाख रुपये जास्त व्याज द्यावे लागणार आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट वीएक्सआय पेट्रोल मॅनुअल टॉप सेलिंग मॉडल आहे. ज्याची एक्स शोरुम किमत 6.95 लाख रुपये आणि ऑन रोड प्राइज 7,81,982 रुपये आहे. जर तुम्ही एक लाख रुपये डाउनपेमेंट करणार असाल तर 6,81,982 रुपये कार लोन घ्यावे लागणार आहे. लोन जर तुम्ही पाच वर्षांसाठी कर्ज घेतात 9 टक्क्यांनी व्याजदर असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 14,157 रुपये इएमआय भरावा लागेल. स्विफ्ट वीएक्सआय फायनान्स केले असल्यास पाच वर्षांनंतर 1.67 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.
(Disclaimer: स्विफ्टच्या या दोन्ही प्रकारांना फायनान्स करण्यापूर्वी, तुम्ही जवळच्या मारुती सुझुकी एरिना शोरूमला भेट दिली पाहिजे आणि कारचे कर्ज आणि EMI तपशील तपासा.)