Monster Energy Yamaha MotoGP: 'द कॉल ऑफ द ब्ल्यू' या आपल्या अभिनय मोहिमेअंतर्ग इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज 2023 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्स पहिल्यांदाच बाईक चाहत्यांसमोर आणले आहेत. या मॉडेल्समध्ये सुपरस्पोर्ट वायझेडएफ-आर 15 एम, डार्क वॉरियर एमटी-15 व्ही 2.0 आणि रे झेडआर 125 फाय हायब्रिड स्कूटरचा समावेश आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्समधील या बाईक ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून भारतातील सर्व प्रीमियम ब्ल्यू स्क्वेअर आउटलेट्समध्ये उपलब्ध होणार आहे.
मॅक्सी-स्पोर्टस् स्कूटरची विशेष मोटोजीपी एडिशन एईआरओएक्स 155 लवकरच बाजारात येणार आहे. वायझेडएफ-आर 15 एम आणि एमटी-15 व्ही 2.0 च्या 2023 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशनमधील वाहनांचे टँक श्रड्स, इंधन टाकी व साइड पॅनल्सवर यामाहा मोटोजीपीची ओळख असलेलं चिन्हं तसेच मॉन्स्टर बॅच देण्यात आलं आहे. या माध्यमातून या बाईक्स रेसिंग पार्श्वभूमीच्या असल्याचं अधोरेखित होणार आहे. तर एईआरओएक्स 155 आणि रे झेआर मॉडेल्सच्या संपूर्ण बॉडीवर यामाहा मोटोजीपी पद्धतीची असणार आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल मर्यादित संख्येत बाजारात उतरवल्या जाणार आहे.
“भारतात प्रथमच येणाऱ्या मोटोजीपी रेसबद्दल यामाहाच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्साह आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल आज बाजारात आल्याने त्यांच्या उत्साहात अधिकच भर पडणार आहे असे आम्हाला वाटते," असं यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष ईशान चिहाना म्हणाले.
2023 मोटोजीपी एडिशन्स एक्स-शोरुम (दिल्ली) भारतीय रुपयांमध्ये
वायझेडएफ-आरफिफ्टीनएम 1,97,200
एमटी-फिफ्टीन व्हीटूपॉइंटझिरो 1,72,700
रे झेडआर 125 फाय हायब्रिड 92,330
मोटीजीपी चॅम्पियनशीपची 13 वी फेरी सुरु आहे. या स्पर्धेच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहेत. पोर्तुगालमध्ये मार्च महिन्यात पहिली फेरी झाली. स्पेनमध्ये शेवटची म्हणजेच 20 वी फेरी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. भारतामधील फेरी मोटोजीपी भारत या नावाने आयोजित करण्यात आली होती. 22, 23, 24 सप्टेंबर रोजी नोएडामधील बुद्धा सर्किटवर ही फेरी पार पडली. याच पार्श्वभूमीवर यामाहाने भारतीय बाईक चाहत्यांसाठी या विशेष दुचाकी लॉन्च केल्या आहेत. या जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये भारताचा समावेश करण्यात आल्याने बाईकप्रेमींमध्ये याबद्दल विशेष उत्साह दिसून येत आहे. यामध्ये भर टाकण्यासाठीच मोटोजीपीपद्धतीच्या सुपरबाईक स्टाइलमधील दुचाकी ग्राहकांना यमाहाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.