भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी

जगातील सर्वात महागडी स्कूटी

शैलेश मुसळे | Updated: Apr 14, 2018, 10:46 AM IST
भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी title=

मुंबई : ब्रिटेनमधली प्रसिद्ध कंपनी स्कोमादी भारतामध्ये आता पाऊल ठेवणार आहे. स्कोमादी आपली टू-व्हीलर स्कूटी भारतात लाँच करणार आहे. लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी ही कंपनी खूप प्रसिद्ध आहे. ही कंपनी TL200, TL200i, TL50, TL125 आणि TT125 या स्कूटींचं उत्पादन करत आहे. कंपनीने पुण्यामधील AJ डिस्टीब्यूटर्ससोबत करार केला असून त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. भारतात सध्या TT125 स्कूटीची विक्री केली जाणार आहे. कंपनीने ही जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचं म्हटलं आहे. या स्कूटीची किंमत 2 लाख रुपये आहे.

स्कूटीचं डिझाईन वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखं आहे. स्कूटीला मॉडर्न लूकसह LED हेडलाईट आणि टेललाईट देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यामध्ये 12 इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. 100 किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये 11 लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. TT125 मध्ये अप्रिलियाचं 125cc चं इंजन असणार आहे. 

इंजीन हे इटलीवरुन आणून थायलंडमध्ये बनवल्या जाणाऱ्या TT125 मध्ये लावलं जाईल. इंजीन 7300rpm वर 11bhpचं पॉवर जेनरेट करतो. अपग्रेडेड एग्जॉस्ट सिस्टमने इंजीन 15bhp पर्यंत पॉवर जनरेट करेल. ब्रेकसाठी स्कूटीमध्ये फ्रंट व्हीलमध्ये 220 mm डिस्क आणि रियरमध्ये डुअल चॅनेल ABS फीचर देण्यात आले आहेत. Scomadi च्या TT 125 स्कूटी मे 2018 मध्ये लाँच केली जाणार आहे.