close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कमी किंमतीत दमदार फिचर्स असणारा 'Motorola'चा नवा स्मार्टफोन लॉन्च

मोटोरोला वन मॅक्रो (Motorola One Macro) स्मार्टफोन लॉन्च

Updated: Oct 11, 2019, 05:49 PM IST
कमी किंमतीत दमदार फिचर्स असणारा 'Motorola'चा नवा स्मार्टफोन लॉन्च

नवी दिल्ली : मोटोरोला कंपनीकडून (Motorola) मोटोरोला वन मॅक्रो (Motorola One Macro) हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

Motorola One Macro फोनची बॅटरी ४ हजार mAh असून कंपनीकडून दोन दिवस बॅटरी बॅकअप असण्याचा दावा केला आहे. 

या फोनला देण्यात आलेला मायक्रो कॅमेरा सेन्सर फोनचे खास वैशिष्ट्य ठरत आहे. १३ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह फोन लॉन्च करण्यात आला आहे. 

Motorola One Macro ची वैशिष्ट्ये - 

- ओक्टा कोर प्रोसेसर (octa-core processor)
- ६. २० इंची डिस्प्ले
- ६४ जीबी स्टोरेज
- ४ जीबी रॅम
- ८ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
- १२ + २ + २ मेगापिक्सल रियल कॅमेरा
- ४००० mAh बॅटरी
- Android 9 Pie OS