मुंबई : बाजारात आज अनेक प्रकारचे स्मार्टफोन्स येत आहेत. काही काळापासून फोल्डेबल स्मार्टफोन्सना खूप पसंती दिली जात आहे. फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्सचे वर्चस्व असताना, इतर स्मार्टफोन निर्माते त्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहेत.
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मोटोरोला आपला नवीन दोन स्क्रीन स्मार्टफोन Motorola RAZR 3 लॉन्च करणार आहे. या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
चायनीज स्मार्टफोन ब्रँड Motorola नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Motorola RAZR 3 लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तरी याचे काही फोटो लीक झाले आहेत. ज्यावरून या फोनच्या डिझाईनची कल्पना येते. या स्मार्टफोनची घोषणा जुलै किंवा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.
Motorola RAZR 3 बद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, समोर आलेल्या फोटोवरून मोटोरोलाचा हा दोन स्क्रीन स्मार्टफोन सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फ्लिपला डिझाईनच्या बाबतीत टक्कर देईल हे निश्चित.
मोटोरोलाचा फोन सॅमसंगच्या स्मार्टफोनपेक्षा स्मूद असेल आणि तिरक्या कडांसह येईल असे दिसते. Motorola चा हा नवा फोल्डेबल स्मार्टफोन Motorola RAZR 3 Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करू शकतो. 8/12GB RAM आणि 256/512GB अंतर्गत स्टोरेज या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल.
फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट असू शकेल. हा फोन 32MP फ्रंट कॅमेरासह मार्केटमध्ये येऊ शकतो. Motorola RAZR 3 च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे तर ते फुल एचडी + रिझोल्यूशनसह येऊ शकते आणि त्यात एक लवचिक पॅनेल दिले जाऊ शकते.