Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2024, 09:31 AM IST
Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम title=
मुकेश अंबानींना कोर्टाची नोटीस

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी ग्राहकांच्या हातात जिओ फोन देऊन बाजारात खळबळ उडवून दिली. त्यात मोफत कॉलिंग, इंटरनेट डेटा देऊन मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित केले. मुकेश अंबानी यांची संपत्ती साधारण 100 अरब डॉलरच्या घरात असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या अनेक व्यवसायांपैकी जिओ हा एक व्यवसाय असून देशभरात त्याचे लाखो ग्राहक आहेत. जिओचे नेटवर्क देशातील गावागावात पोहोचलंय. जिओकडून आपल्या ग्राहकांना मोठमोठ्या ऑफर्स आणि सुविधा दिल्या जातात. त्याप्रकारे सुविधांचा अभाव असेल तर ग्राहकांकडून जिओ संदर्भात तक्रारीदेखील येतात. अशाच एका तक्रारी संदर्भात एका ग्राहकाने थेट रिलायन्सचे सर्व्हेसर्व्हा मुकेश अंबानी यांनाच कोर्टात खेचलंय. काय आहे हा वाद? सविस्तर जाणून घेऊया.  

25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागेल, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुजफ्फरपूर ग्राहक न्यायालयाने हे आदेश जारी केले आहेत. 

जियो सिम बंद करण्यासंदर्भातील वाद 

समोर आलेल्या माहितीनुसार जियो सिम बंद करण्यासंदर्भातील हे प्रकरण आहे. काही महिन्यांपुर्वी एका ग्राहकाचा नंबर जिओ कंपनीकडून बंद करण्यात आला. यानंतर ग्राहकाने जिओ कंपनीच्या अधिकृत कार्यालयात जाऊ तक्रार दाखल केली. पण त्याला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आली. 

कंपनीकडून अचानक सिम बंद 

यानंतर ग्राहकाने आपल्या नंबरचे स्टेटमेंट मागवले. यात आपण 25 मे 2025 पर्यंत प्राइम मेंबर असल्याचे त्याला कळाले. आपण वेळेवर मोबाईल नंबर रिचार्ज करतो. तरीही कंपनीने माझा नंबर बंद केला, याचा ग्राहकाला प्रचंड राग आला आणि मनस्तापदेखील झाला. 

रागाच्या भरात अंबानींवर ठोकली केस 

सिम अचानक बंद झाल्याने ग्राहकाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर त्याने मानवाधिका अधिवक्ता एस.के झा यांच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. 

यावर सुनावणी करताना न्यायालयाने रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि मुजफ्फरच्या जिल्हा कार्यालय शाखा प्रबंधकाविरोधात नोटीस जारी केली आहे. दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी दोघांनाही आयोगाच्या समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागितली 10 लाखांची भरपाई 

माझा मोबाईल नंबर माझ्या कार्यक्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्तींकडे आहे. पण नंबर अचानक बंद झाल्याने माझे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झालं. यामुळे त्याने 10 लाख 30 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. तक्रारदाराने आयडीया कंपनीचे सिम घेतले होते आणि ते जियोमध्ये पोर्ट केले होते. त्यावेळी तक्रारदाराने सर्व कागदपत्रेदेखील जमा केली होती.