मुंबई : राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैला लावण्याचे निर्देश दिले असले, तरी हे निकाल रखण्याचीच चिन्ह आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मुदतीत निकाल लागणार नसल्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं आर्टस आणि इतर काही अभ्यासक्रमाचे रखडण्याची शक्यता आहे.
उशीरा निकाल लागला तरी हरकत नाही मात्र चुकीला निकाल लावणार नसल्याची भूमिका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी बैठकीत मांडली. तर उशिरा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुकावं लागणार त्याला जबाबदार कोण असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय. या बैठकीला कुलगुरू संजय देशमुखही उपस्थित होते.