How To Watch Netflix , Amazon Prime For Free : आजकाल लोक वेब मालिका आणि सिनेमाचा आनंद घेण्यासाठी घरबसल्या OTT Platformsची मदत घेतात. आता लोक फक्त Netflix, Amazon Prime, Sony Liv, Disney + Hotstar सारख्या प्लॅटफॉर्मवर टीव्ही शो, सिनेमा पाहतात. आता हे सगळं तुम्हाला मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार मेंबर शुल्क विनामूल्य देण्याचे जाहीर केले आहे.
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार सारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवांवर अनेक गोष्टी पाहणे आता पूर्णपणे विनामूल्य पाहणे शक्य आहे. महाग सबस्क्रिप्शन चार्जेसमुळे तुम्ही कंटेंट पाहू शकत नसाल तर आता तुम्ही सबस्क्रिप्शन चार्जेस न भरता ते पाहू शकता. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ही एक ऑफर दिली आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार मोफत पाहू शकतात. Airtel ने Netflix प्रीमियम योजना जाहीर केली आहे.
एअरटेलच्या 1,199 रुपयांच्या पोस्टपेड प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे यात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन समाविष्ट केले आहे. ज्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या योजनेद्वारे, तुम्ही नेटफ्लिक्सच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसह त्यांचे सर्व मूळ शो आणि सिनेमांचा आनंद घेऊ शकता. ही एक अतिशय स्वस्त आणि चांगली ऑफर आहे. जी तुम्हाला Netflix सदस्यत्वासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही.
Airtel च्या Rs 1,199 पोस्टपेड प्लानमध्ये, तुम्हाला फक्त मोफत Netflix सबस्क्रिप्शनच मिळत नाही तर Amazon Prime आणि Disney+Hotstar सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळतात. याव्यतिरिक्त, तुम्हाला तीन मोफत फॅमिली अॅड-ऑन देखील दिले जातात. हा प्लान अमर्यादित कॉलसह येतो आणि 150GB डेटा रोलओव्हरसह देखील दिला जातो. यासोबतच तुम्ही दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेऊ शकता.
एअरटेलने ऑफर केलेल्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये, ग्राहकांना 100GB डेटा रोलओव्हरसह Amazon Prime आणि Disney+Hotstar ची मोफत मेंबरशीप मिळते. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन नाही, पण दोन मोफत फॅमिली अॅड ऑन प्लान दिले आहेत, जेणेकरुन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.