मुंबई: कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोबाईल किंवा लॅपटॉप मुलांकडे असणं आता सध्याची गरज झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये महागातले लॅपटॉप घेणं प्रत्येकाला परवडत नाही. त्याचा विचार करून एका कंपनीनं स्वस्तात लॅपटॉप काढले आहेत.
आसूस कंपनीने अगदी 17 हजारापासून ते 30 हजारापर्यंत वेगवेगळ्या फीचर्सचे Asus Chromebook नुकतेच लाँच केले आहेत. दोन लॅपटॉप हे टच शिवाय तर बाकीचे स्क्रिनटच लॅपटॉप खास विद्यार्थ्यांची गरज ओळखून कंपनीने लाँच केले आहेत. हे नवीन लॅपटॉप 22 जुलै रोजी फ्लीपकार्टवर उपलब्ध होणार आहेत.
Asus Chromebook C223 ही नवीन रेंज 17,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. C423 नॉन-टच वेरिएन्ट 19,999 रुपयांना फ्लीपकार्टवर उपलब्ध होणार आहे. 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हे लॅपटॉप उपलब्ध होतील. नॉन-टच मॉडल क्रोमबुक C523 20,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. C423 व्हेरिएन्ट 23,999 आणि C523 व्हेरिएन्ट 24,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
- य़ा सीरिजमध्ये LED डिस्प्ले 1366×768 रिझोल्यूशनसह मिळणार आहे
-Chromebook C423 मध्ये 1366×768 पिक्सेल 14 इंच 60Hz एलईडी टच स्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे
- 32GB स्टोरेज क्षमता असेल तर 4 GB रॅम असणार आहे
-या सीरिजमध्ये Intel Celeron Dual Core N4020 मिळणार आहे. जो इंटेल i3 पेक्षा थोडा कमी स्पीडचा असणार आहे
- USB पोर्ट 3 देण्यात आले आहेत.