२ डिस्प्ले आणि ३ कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च

स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

shailesh musale Updated: Apr 3, 2018, 08:34 PM IST
२ डिस्प्ले आणि ३ कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च title=

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. Meizu या कंपनीने भारतात मंगळवारी नवा स्मार्टफोन लान्च केला आहे. Meizu Pro 7 असं या फोनचं नाव आहे. Meizu Pro 7 ची खासियत म्हणजे या फोनमध्ये दोन डिस्प्ले आणि दोन रेअर कॅमेरे आहेत.

किती आहे किंमत

भारतात Meizu Pro 7 ची किंमत 22,999 रुपये आहे. स्मार्टफोन एक्सक्लूझिव्हपणे अॅमेझॉन इंडियावप खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने ट्विट करत फोनचा लिमिटेड स्टॉक असल्याची माहिती दिली आहे. काळ्या आणि लाल रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

२ डिस्प्लेचा पहिला फोन

या स्मार्टफोनचं वैशिष्ट्यमध्ये या फोनमध्ये २ डिस्प्ले आहेत. मागे देखील एक डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या खाली 1.9 इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. नोटिफिकेशन पाहण्यासाठी हा बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. इंटरनॅशनलमध्ये याची खूप चर्चा आहे. 5.5 इंचाची फुल HD AMOLED स्क्रीन या फोनमध्ये देण्यात आली आहे.

२ रेअर कॅमेरे

Pro 7 चा रेअर डुअल LED फ्लॅशसोबत 12MP चे दोन कॅमेरे आहेत. तर फ्रंटमध्ये f/2.0 अॅपर्चरसोबत 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्राईड 7.0 नूगट बेस्ड Flyme 6 वक काम करतो. यामध्ये कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C सपोर्ट देण्यात आला आहे.

4GB रॅम, 64GB की इंटरनल मेमरी

Meizu Pro 7 मध्ये 5.5-इंचाचा फूल HD सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसरमध्ये MediaTek Helio P25 देण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB की इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी 3,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर होम बटनमध्ये देण्यात आला आहे.