Nokia T10 Price In India: Nokia लवकरच भारतात आपला मजबूत बॅटरीचा टॅबलेट लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच टॅबलेटची किंमत उघड झाली आहे. फीचर्स जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...
Nokia T10 टॅबलेट या वर्षी जुलैमध्ये जागतिक बाजारपेठेत अधिकृत लॉन्च करण्यात आला होता. लवकरच हा टॅबलेट आता भारतात लॉन्च होईल असे दिसते. Nokia T10 अजून Nokia India वेबसाइट किंवा Amazon India वर लिस्ट झालेला नाही. तथापि, टॅबलेटसाठी Amazon च्या ग्रेट इंडिया फेस्टिव्हल 2022 लँडिंग पृष्ठावर T10 ची किंमत 11,999 रुपये देण्यात आली आहे.
हा टॅबलेट युरोपमध्ये फक्त वाय-फाय आणि वाय-फाय + 4G प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. टॅबलेटच्या दोन्ही आवृत्त्या भारताला मिळतील की नाही हे स्पष्ट नाही. येत्या काही दिवसांत हा परवडणारा टॅबलेट देशात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Nokia T10 मध्ये 8-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. जो 1280 x 800 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. टॅबलेट Netflix HD साठी प्रमाणित आहे. डिव्हाइस Unisoc T606 चिपसेटद्वारे सपोर्ट करतो. हा Android 12 OS वर चालतो. कंपनीने 2 वर्षांचे OS अपग्रेड आणि 3 वर्षांचे मासिक सुरक्षा अपटेड ऑफर करण्याची संधी दिली आहे.
हा टॅबलेट 3GB/4GB रॅम आणि 32GB/64GB इनबिल्ट स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्ड जोडण्यासाठी डिव्हाइसवर हायब्रिड सिम स्लॉट आहे. हे USB-C पोर्टद्वारे 10W चार्जिंग सपोर्टसह 5,250mAh बॅटरीद्वारे सपोर्ट करत आहे.
T10 मध्ये 2-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ऑटोफोकस आणि LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा, OZO ऑडिओ प्लेबॅकसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि IPX2 रेटिंग आहे. एलटीई व्हेरियंट प्रॉक्सिमिटी सेन्सरने सुसज्ज आहे. हा केवळ ओशन ब्लू कलरमध्ये येतो.