UPI Lite: भारतात कॅशलेस पेमेंट अधिक सामान्य होत आहे. UPI पेमेंट सर्वत्र वापरले जात आहे. मग ते शॉपिंग मॉल असो की रस्त्यावरील विक्रेते. प्रत्येकजण कॅशलेस पेमेंटला प्राधान्य देत आहेत. UPI हा सर्वात सोपी पेमेंट पद्धत आहे. फक्त पिन टाकले की आपले काम सोपं होतं. त्यामुळे यामाध्यमातून पेमेंट त्वरित केले जाते. आता सरकारने ही सेवा अधिक सुलभ केली आहे. आता UPI Lite सेवा सुरु करण्यात आली आहे. हे वापरकर्त्यांना UPI पिन न वापरता 200 रुपयांपर्यंत पेमेंट करु शकतात.
UPI Lite हे ऑन-डिव्हाइस वॉलेट आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून अॅपच्या वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागतील. ऑन-डिव्हाइस वॉलेटमुळे, ते रिअल टाइम पेमेंटसाठी इंटरनेट वापरत नाही. तसेच, पिन टाकण्याची गरज नाही. ऑफलाइन पद्धतीने व्यवहार करता येतात.
मात्र यातून फक्त किरकोळ पेमेंट करावे लागणार आहे. त्याची मर्यादा केवळ 200 रुपये करण्यात आली आहे. तुम्ही ऑन-डिव्हाइस वॉलेटमध्ये 2,000 रुपयांपर्यंत शिल्लक ठेवू शकता. हे अमर्यादित वापरले जाऊ शकते. UPI लाइट सक्षम करण्यात आले असून अनेक बँकांचा समावेश करण्यात आला आहे.
बॅलेन्स जोडण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असेल. ऑनलाइन पद्धतीद्वारे बॅलेन्स जोडल्यानंतर, तुम्ही ऑफलाइन पेमेंट करु शकाल. UPI ऑटो पे वापरुन देखील बॅलेन्स जोडला जाऊ शकतो. एकूणच, यूजर्स UPI Lite द्वारे जलद आणि सुलभ पेमेंट करु शकतील.