मुंबई: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. त्यामुळे कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीचे स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच करत आहेत. ग्राहकही आपल्या गरजेनुसार स्मार्टफोनची निवडक करतात. आता मोबाईलप्रेमींमध्ये ट्रान्सपरेन्ट फोनची चर्चा सुरु आहे. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. Nothing Phone या आठवड्यात आरपार दिसणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. नथिंगचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. चला जाणून घेऊयात या स्मार्टफोनच्या लाँचिंग तारीख, स्पेक्स आणि किंमतीबाबत.
लाँचिंग तारीख
नथिंग फोन (1) च्या लाँच तारखेबाबत सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु अधिकृतपणे या स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केलेली नाही. कंपनीने नथिंगच्या या पहिल्या स्मार्टफोनबाबत नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये फक्त 'दिस वीक' असे लिहिले आहे. या ट्विटमधून अनेक अर्थ काढले जात आहेत. अंदाजानुसार, नथिंग फोन (1) या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो किंवा असे देखील होऊ शकते की कंपनी या आठवड्यात स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर करू शकते.
This week.
— Nothing (@nothing) June 6, 2022
फीचर्सबाबत जाणून घ्या
अहवालांनुसार, नथिंग फोन (1) तुम्हाला 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले आणि 1080 x 2400 पिक्सेलचे रिझोल्यूशन असू शकतो. हा स्मार्टफोन फ्लॅट डिस्प्ले सह येऊ शकतो. तुम्हाला नथिंग फोन (1) मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिळेल.
अँड्रॉईड 12 OS वर काम करणारा हा फोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. नथिंग फोन (1) मध्ये, तुम्हाला 50MP मुख्य सेन्सरसह कॅमेरा मिळू शकतो. तसेच 5000mAh बॅटरी आणि जलद चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज असू शकतो.