खूशखबर! आता इन्स्टाग्रामवरही करता येणार शॉपिंग

इन्स्टाग्राम युजर्ससाठी खूशखबर...

Updated: Jun 15, 2018, 04:34 PM IST
खूशखबर! आता इन्स्टाग्रामवरही करता येणार शॉपिंग title=

मुंबई : इंस्टाग्रामवर जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दररोज 30 कोटी अॅक्टीव्ह युजर असणाऱ्या इंस्टाग्रामने आणखी एक फीचर आणलं आहे. आता इंस्टाग्रामवर स्टोरीजच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केली जाणार आहे. फोटो शेअरिंगसोबत तुम्ही जाहिरात देखील पाहिली असेल. फेसबूकचा अधिकार असलेल्या इंस्टाग्रामवर आता शॉपिंग बॅग आयकॉनसोबत स्टीकर दाखवला जाईल त्यामध्ये तुम्ही शॉपिंग स्टोरी पाहू शकता.

इंस्टाग्राममध्ये या फीचरची अनेक दिवसांपासून चर्चा होती. इंस्टाग्राम स्टोरीजचं स्नॅपचॅट पाहून ऑगस्ट 2016 मध्ये लॉन्च झालेल्या इंस्टाग्राम आता बिझनेसवर फोकस करत आहे.

काही मोजके ब्रँड Adidas, Aritzia, Louis Vuitton यांना सुरुवातीला हे फीचर मिळेल. त्यानंतर रेग्युलर फीचर म्हणून ते येईल. शॉपिंग बॅग आयकॉनसह एक स्टीकर असेल. जे यूज़रला अधिक डिटेल सारखी सुविधा दाखवण्यासाठी मदत करेल. Instagram ने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून म्हटलं की, ''आज आम्ही इंस्टाग्राम स्टोरेज फीडवरुन इतर शॉपिंगचा विस्तार करत आहोत.''