सोशल मीडिया सांगणार, डिप्रेशन स्टेटस ?

हे आता सोशल मीडिया सांगणार आहे. तुमच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, हे सर्वकाही संकेत देतात. 

Updated: Aug 13, 2017, 05:56 PM IST
सोशल मीडिया सांगणार, डिप्रेशन स्टेटस ? title=

वॉशिंग्टन : तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही? हे आता सोशल मीडिया सांगणार आहे. तुमच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, हे सर्वकाही संकेत देतात. तुम्हाला आनंद झाल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे लवकरात लवकर सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी उत्साही असताता, तसेच तुम्हाला राग किंवा संताप, तसेच दु:ख झाल्याल तुम्ही ते सोशल मीडियावर व्यक्त करतात.

संशोधकांनी सोशल मीडियाच्या अॅपवरील १६६  यूझर्सच्या ४३ हजार ९५०  फोटोंचं निरीक्षण करुन विश्लेषण करण्यासाठी या कम्प्युटर प्रोग्रामचा वापर केला गेला. यामध्ये ७१ लोकांच्या वैद्यकीय तपासणीनंतर ते डिप्रेशनमध्ये असल्याचेही निदर्शनास आले. ‘ईपीजे डाटा सायन्स’ या मॅगझिनमध्ये हे संशोधनात्मक विश्लेषण प्रकाशितही झाले आहे.

हे आता फेसबुकवरील पोस्ट किंवा इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन कळू शकेल. संशोधकांनी एक असा कम्प्युटर प्रोग्राम तयार केलाय, ज्याद्वारे डॉक्टरांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे डिप्रेशनचा सुगावा लागू शकतो.

या कम्प्युटर प्रोग्रामद्वारे ६० टक्के डिप्रेस्ड लोकांचा घेता येणार आहे. अमेरिकेतील वर्मोंट विश्वविद्यापीठाच्या क्रिस्टोफर डेनफोर्थ यांच्या माहितीनुसार,'सोशल मीडिया अॅपवर काही लोकांच्या अकाऊंटचं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आले की, डिप्रेशनमध्ये असलेल्यांचे फोटो गडद रंगांमध्ये असतात. शिवाय, त्यांच्या फोटोंवर लोकांनी अधिक कमेंटही केलेल्या असतात. अनेकदा यांमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नाहीत'.

तसेच 'अनेकदा डिप्रेशनमध्ये असलेले लोक फोटो एडिटिंगवेळी फिल्टरचा वापर करतात, मात्र तेही फोटो ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी वापरतात. डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींचे पोस्टही इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतात.'