मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर OnePlus कंपनीने OnePlus Nord Watch भारतामध्ये लाँच केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या स्मार्टवॉचमध्ये AMOLED स्क्रीन दिली आहे. त्यासोबतच, या वॉचमध्ये तडफदार बॅटरी दिली असून यामध्ये हार्ट-रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेवल मोजण्याची सुविधा उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये असलेल्या इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया...
वनप्लसच्या या स्मार्टवॉचमध्ये 1.78 इंच आकाराचा AMOLED डिस्प्ले दिलेला आहे, ज्याचं रेजलूशन 368×448 पिक्सल असून, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 500 निट्स आहे. OnePlus Nord Watch च्या उजव्या बाजूला पावर बटन उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचने उत्तम दर्जाचा परफॉर्मंसद्यावा यासाठी स्मार्टवॉचमध्ये SF32LB555V4O6 चिपसेट आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम दिलेली आहे.
OnePlus Nord Watch या स्मार्टवॉचमध्ये कनेक्टिविटीसाठी Bluetooth 5.2 उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने या स्मार्टवॉचशी Android आणि Apple मोबाईल कनेक्ट केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, तडफदार बॅटरी देखील दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये तब्बल 10 दिवसाचा बॅकअप देते.
वनप्लस कंपनीच्या Nord या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. डीप ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक या रंगांमध्ये OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करता येते. त्याचबरोबर, आजपासून (4 ऑक्टोबर) ही स्मार्टवॉच Amazon द्वारे खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या खरेदीवर आयसीआयसीआय (ICICI) आणि एक्सिस बँकेकडून (Axis Bank) 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला जातोय. हा डिस्काऊंट डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी आहे.