Online Shopping : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात इ-कॉमर्स वेबसाईटवरुन (E Commerce Website) शॉपिंग केली गेली. तेव्हापासून आतापर्यंत ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) जोर हा कित्येक पटीने वाढलाय. अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या इ-कॉमर्स वेबसाईट्सबद्दल आपल्या सर्वांना माहितीय. मात्र एक अशी वेबसाईट आहे, जी इतर वेबसाईट्सच्या तुलनेत जवळपास अर्ध्या दरात प्रोडक्ट्स देत आहे. या वेबसाईटवरुन स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करु शकता. (online e commerce website meesho is selling products in a reasonable rate compared to amazon and flipkart)
मीशो (Meesho) या इ-कॉमर्स वेबसाईटची सध्या जोरदार चलती आहे. या वेबसाईटवर इतर वेबसाईटच्या तुलनेत भरघोस डिस्काउंट दिलं जातं. डिस्काउंटही फक्त 4-5 टक्के नाही, तर जवळपास 50 टक्के दिलं जातं. त्यामुळे ग्राहक या वेबसाईटवरुन खरेदी करु शकतात.
मीशोवर सर्वाधिक डिस्काउंट हे स्मार्टफोन एसेसरीजवर दिलं जात आहे. यामध्ये ब्लूटूथ इअरफोन, पावर बँक आणि हेडफोन्सचा समावेश आहे. मार्केटमध्ये या स्मार्टफोन एसेसरीजची किंमत 800 ते 2500 रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र मीशोवर या एसेसरीजची सुरुवात 100-300 रुपयांपासून आहे. ही रक्कम ऑफलाईन मार्केटच्या तुलनेत फारच कमी आहे.