या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 26, 2018, 06:16 PM IST
या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात title=

मुंबई : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ओप्पो कंपनीने आपला A71 या स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांनी कपात केली आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजरपेठेत लॉन्च करण्यात आला होता.

ओप्पो कंपनीने आपला A71 हा स्मार्टफोन लॉन्च केला त्यावेळी त्याची किंमत 12,990 रुपये होती. मात्र, आता हा फोन तुम्हाला स्वस्तात मिळत आहे.

अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवर आपला A71 या फोनवर 3,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला आता 9,990 रुपयांत मिळणार आहे. मात्र, कंपनीने यासंदर्भात कंपनीने कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाहीये.

काय आहेत फिचर्स...

ड्युअल सिम सेटअप असलेल्या ओप्पो A71 हा स्मार्टफोन मेटल युनिबॉडीसोबत उपलब्ध आहे. यामध्ये 5.2 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑपरेटींग सिस्टमचा विचार केला तर हा फोन अँड्राईड के 7.1 नूगावर आधारित OS 3.1 वर काम करतो. 

या फोनमध्ये 1.5 गिगाहर्ट्सचा 64- बिट ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंग दरम्यान हा फोन हँग होत नाही. हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 16 GB मेमरी कार्डसोबत उपलब्ध आहे.

कॅमेरा प्रेमींसाठी खास 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये अॅपरचर f/2.2 आणि LED फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी अॅपरचर f/2.4 सोबत 5 मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये स्प्लिट स्क्रिन, आय प्रोटेक्शन डिस्प्लेसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

इतर फिचर्स...

कनेक्टिविटीचा विचार केला तर यामध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्ल्यूटूथ 4.0, जीपीएस आणि मायक्रो USB सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हा फोन डिस्टेंस सेंसर, लाईट सेंसर, जी-सेंसर आणि ई-कंपास सारख्या फिचर्ससोबत उपलब्ध आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन गोल्ड आणि ब्लॅक करर्समध्ये उपलब्ध आहे.