दमदार 'ओप्पो फाईंड एक्स' आज होतोय लॉन्च

ओप्पोचे याअगोदर फाईंड ७ आणि फाईंड ६ ए हे दोन हँडसेट अगोदरच लॉन्च करण्यात आलेत. 

Updated: Jun 19, 2018, 11:00 AM IST
दमदार 'ओप्पो फाईंड एक्स' आज होतोय लॉन्च  title=

मुंबई : Oppo Find X हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लॉन्च होतोय. Oppo Find X हा स्मार्टफोन कंपनीचा नवा फ्लॅगशिप फोन होणार आहे. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीनं ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिलीय. फाईंड सीरिजमध्ये ओप्पोचे याअगोदर फाईंड ७ आणि फाईंड ६ ए हे दोन हँडसेट अगोदरच लॉन्च करण्यात आलेत. 

Oppo Find X च्या स्पेसिफिकेशन्स माहिती अद्याप उघड झालेली नाही, परंतु, काही फोटोंतून मात्र या फोनच्या डिझाईनची कल्पना येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, Oppo Find X मध्ये स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, ६ आणि ८ जीबी रॅम विकल्प आणि व्हर्टिकल ड्युअल रिअर कॅमेरा मागच्या बाजुला दिलाय. सोबतच एक दमदार सेल्फी कॅमेराही या फोनमध्ये असेल. Oppo Find X मध्ये ६.४२ इंचाचा डिस्प्ले असेल आणि यात क्यूएचडी रिजॉल्युशन असेल, असं सांगण्यात आलंय.