OPPO K12x 5G: कितीही आपटा, ओल्या स्क्रीनवरही सर्फिंग, 4 वर्षं बॅटरीचं टेन्शन नाही; फक्त 12,999 रुपयांत ऑल राउंडर स्मार्टफोन

OPPO K12x 5G: जर तुम्ही ड्युरेबल, दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरा, स्लीक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्सने सुसज्ज असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर OPPO K12x 5G हा चांगला पर्याय आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2024, 02:02 PM IST
OPPO K12x 5G: कितीही आपटा, ओल्या स्क्रीनवरही सर्फिंग, 4 वर्षं बॅटरीचं टेन्शन नाही; फक्त 12,999 रुपयांत ऑल राउंडर स्मार्टफोन  title=

OPPO K12x 5G: तुमच्या हातून मोबाईल सारखा खाली पडतो का? यामुळे तुम्हाला सतत नवीन मोबाईल खरेदी करावा लागतो आणि यामुळे आर्थिक गणित बिघडतं का? असं असेल तर मार्केटमध्ये आता OPPO K12x 5G स्मार्टफोन आला आहे जो है 360 डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडीने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 5100mAh ची पॉवरफूल बॅटरी आणि 45W SUPERVOOCTM चा चार्जर मिळतो. याशिवाय या फोनमध्ये IP54-रेटिंग, स्प्लॅश टच आणि 120hz चा 6.67’’ चा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले, AI Linkboost, स्लीक डिजाइन सह अनेक दमदार फीचर्स आहेत. 

जबरदस्त डिझाईन आणि सर्वोत्तम ड्युरेबिलिटी

डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास OPPO K12x 5G हा अतिशय आकर्षक आणि हलका फोन आहे. हा फोन फक्त 7.68mm स्लिम आहे आणि वजन फक्त 186gm आहे. K12x 5G अल्ट्रा-स्लिम आणि लाइटवेट डिझाइनमध्ये असणाऱ्या या सेगमेंटमधील सर्वात हलक्या फोनच्या मधल्या बेझेलभोवती मॅट फिनिश मजबूत पकड देते. OPPO K12x 5G फोन मिडनाईट व्हायलेट आणि ब्रीझ ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

आकर्षक डिझाईनसह हा स्मार्टफोन ड्यूरेबल देखील आहे. OPPO K12x 5G फोन स्वत: OPPO पासून बनवलेल्या हाय-स्ट्रेंथ एलॉय फ्रेमवर्कपासून तयार करण्यात आला आहे. जो लोखंडासारखी मजबुती देतो. 

OPPO K12x 5G हा अधिकृतपणे त्याच्या किमतीच्या श्रेणीतील सर्वात मजबूत फोन आहे, जो ड्रॉप रेझिस्टन्ससाठी मिलिट्री स्टँडर्ड MIL-STD-810H ने प्रमाणित आहे. हा फोन त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे जे सतत धावपळ, प्रवास करतात. ज्यांना फोन सतत खाली पडण्याचा धोका असतो त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. प्रत्येक OPPO K12x 5G स्मार्टफोनने ड्रॉप, इम्पॅक्ट, प्रेशर टेस्ट पास केल्या आहेत.

जबरदस्त बॅटरी, दमदार चार्जिंग

या फोनमध्ये 5100mAh ची दमदार बॅटरी आहे, जी चार वर्षं उत्कृष्टपणे चालते. या फोनच्या बॉक्समध्ये तुम्हाला 45W SUPERVOOCTM फ्लॅश चार्जर देखील मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही हा फोन 10 मिनिटांत 20% आणि 74 मिनिटांत 100% चार्ज करू शकता.

OPPO K12x 5G चार वर्षांहून अधिक सर्वात्तम बॅटरी परफॉर्म्स देतो. OPPO चे स्मार्ट चार्जिंग वैशिष्ट्य तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा वापरता यावर आधारित चार्जिंग प्रक्रियेला अनुकूल करतो. 

किंमत किती?

OPPO K12x 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट तसंच सर्व प्रमुख रिटेल आऊटलेट्स आणि OPPO ई-स्टोअरवर उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना ग्राहकांना काही उत्तम ऑफर उपलब्ध आहेत.