मुंबई : लव्हबर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. या दिवशी तुमच्या आयुष्यातील 'खास' व्यक्तीला शुभेच्छा आणि गिफ्ट दिली जातात. मात्र कामामुळे ऑफलाईन गिफ्ट घेणं शक्य नसल्यास आता ऑनलाईन पद्धतीचेही अनेक पर्याय खुले आहेत.
पेटीएम मॉलवर खास व्हॅलेंटाईन डे स्टोर खुलं करण्यात आलं आहे. यामध्ये अनेक ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे. पेटीएमने गिफ्टवर 80% कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत ऑर्डर करण्यात आलेल्या काही गिफ्ट्सवर मोफत रॅपिंगचीही सोय देण्यात आली आहे.
पेटीएम मॉलवर देण्यात आलेल्या आयडियांमध्ये वॉर्डरोब रिव्हॅम्प चा ऑप्शन देण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमिताने अनेक ब्रॅन्डेड कपडे खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यावर 40% सूट आहे. सोबतच घड्याळ्याही विविध ऑप्शन्सवर 80 % कॅशबॅक देण्यात आली आहे.
महिलांसाठी गिफ्ट्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कॅटवॉक, क्लार्क, Inc.5 या सारख्या ब्रॅन्डवर जास्तीत जास्त 70% आणि कमीत कमी 20% सूट देण्यात आली आहे. महिलांसाठी उपलब्ध क्लचेसवर 80% सूट, मेकअप प्रोडक्सवर 40% कॅशबॅकची सूट आहे.
पेटीएम मॉलवर गॅजेटवरही सूट देण्यात आली आहे. जेबीएल, सोनीच्या हेडफोन आणि स्पीकरवर 15% कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच अॅपल, फिटबिट, स्मार्टवॉचवरही कॅशबॅकची ऑफर आहे. Vivo च्या स्मार्टफोनवर 10% कॅशबॅक देण्यात आली आहे.