'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!

Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 14, 2024, 10:27 AM IST
'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!  title=

Paytm QR Code News In Marathi : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आरबीआय बॅंक नियमांच्या कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम (paytm payments) पेमेंट्स बॅंक लिमिटेडच्या सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आली आहे. पेटीएमच्या या अडचणीमुळे पेटीएम वापरणारे अडचणीत आल्याले निदर्शनात आले. तसेच भीतीमुळे लोक हळूहळू इतर पर्याय शोधू लागले आहेत. अशा परिस्थितीत पेटीएमने एक निर्णय घेतला असून व्यापारी लोकांना पेटीएम वापरताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत. 

याबाबत पेटीएमने सांगितले की, आता घाबरण्याची गरज नाही. Paytm QR कोड 29 फेब्रुवारीनंतरही काम करत राहतील. त्यामुळे  पेटीएम व्यापाऱ्यांना दुसरा कोणताही पर्याय शोधण्याची गरज नाही, अशी माहिती पेटीएमकडून देण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या व्यवहारात अडचणी येत होत्या. अशातच पेटीएमच्या क्यूआर व्यतिरिक्त साउंडबॉक्स आणि कार्ड मशीनमध्ये ही व्यत्यय येत होते. मात्र आता साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन व्यत्ययाशिवाय काम करत राहणार आहे. आरबीआयने 31 जानेवारीला पेमेंट्स बँकेविरुद्ध कठोर निर्णय दिला होता. त्यामुळे पेटीएम वापरकर्ते पेटीएम मशीन आणि क्यूआर कोडबद्दल अजूनही शंका घेत आहेत.  पेमेंट्स बँकेच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांना अलीडेचच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. 

या सर्व अडचणी पाहता,  पेटीएमने मंगळवारी सांगितले की, पेमेंट्स बँक खात्याद्वारे व्यापाऱ्याचे खाते दुसऱ्या बँक खात्याशी जोडले जाईल. बँक निवडताना, एखादी व्यक्ती त्याची पसंती देखील दर्शवू शकते. यामुळे क्यूआर कोडद्वारे येणारे त्यांचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय येत राहतील. सोमवारी ॲक्सिस बँकेने पेटीएमसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी म्हणाले की, आरबीआयने मान्यता दिल्यानंतर ॲक्सिस बँक पेटीएमसोबत काम करण्यास तयार आहे. 

याचदरम्यान पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही अनेक मोठ्या बँकांशी चर्चा करत आहोत. यापैकी कोणाशीतरी भागीदारी लवकरच जाहीर केली जाईल. गेल्या 2 वर्षात कंपनीने बँकांशी जवळून अनेक कामे केली आहेत. आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सोमवारी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय बँक आपल्या निर्णयाचा आढावा घेणार नाही. RBI ने या संदर्भात FAQ जारी करण्याची घोषणा केली होती.