मुंबई : शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्यातून मोठे ट्रेडर्स झालेले, राकेश झुनझुनवाला यांची शेअर बाजारात झालेली एंन्ट्री ही आजही अनेकांना प्रेरणा देणारी कहाणी ठरलेली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी शेअरबाजारात १९८५ साली प्रवेश केला ही कहाणी खूप रंजक आहे. आजही काही जाहीर कार्यक्रमात राकेश झुनझुनवाला हा किस्सा सांगतात. 5 हजार रुपये घेऊन मी शेअर बाजारात उतरलो, तसेच व्यवसायात यश मिळवणे हे आपल्या मारवाडी समाजाच्या रक्तात असल्याचंही ते अभिमानाने सांगतातय.
तर ऐका राकेश झुनझुनवाला यांच्या शब्दात त्यांची करोडपती होण्याची ती टर्निंग पॉईन्ट देणारी घटना...
राकेश झुनझुनवाला म्हणतात, पप्पा मम्मीसोबत राहत होतो, लग्न झालेलं नव्हतं, घरखर्च आईवडील करत होते, माझा भाऊ प्रक्टिसिंग चार्टड अकाऊंटंट होता, तर त्याने माझ्या त्याच्या २ - ३ क्लायंटसोबत माझी ओळख करुन दिली.
तर मी त्यांना विश्वास मिळवून दिला की ते जे काही कर्ज देतील त्याची मी परतफेड करेन, त्या काळात १२ ते १३ टक्के व्याज घेतलं जात होतं. मी तर त्यांना सांगितलं, ''मी १८ टक्के व्याज देईन. पण तुम्ही मला पैसे द्या''. पहिल्यांदा एका महिलेने पैसे दिले आणि तिने म्हटलं की, ''माझ्या पैशांना सुरक्षितता कशी देता येईल, म्हणजे पैसे परत करण्याची हमी कोण देणार?'' त्यावर मी म्हणालो, ''माझ्याकडे हमी मीच आहे, बाकी दुसरं काही नाही''.
तर ती महिला म्हणाली, ''ठिक आहे, मी तुम्हाला अडीच लाख रुपये देईन. पहिल्यांदा सव्वा लाख रुपये घे. त्या सव्वालाखाचे शेअर्स घे आणि ते माझ्याकडे पैशांची हमी म्हणून दे, (त्या काळी शेअर्स सर्टिफिकेट मिळत होती,) ते शेअर सर्टिफिकेट हमी म्हणून दे, यानंतर तुला सव्वा लाख देईन, असं त्या महिलेने सांगितल्यानंतर मी शेअर बाजारात पाऊल ठेवलं.''
राकेश झुनझुनवाला म्हणतात, ''मग माझ्या भावाच्या एका क्लाएंटने मला १० लाख रुपये दिले. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, पण ही १९८५ ची गोष्ट आहे, मी एका वर्षात त्या साडेबारा लाख रुपयांवरुन ३० लाख कमवले. एवढंच नाही, त्या काळात मी ४ लाख रुपये टॅक्स देखील भरला.''