viral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर

गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Jan 29, 2018, 06:39 PM IST

मुंबई :  गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यूट्यूब आणि फेसबूकवर या उंदीराचे अनेक व्हिडिओ तुम्हांला पाहायला मिळतील.  या व्हिडिओमध्ये उंदराला साबण फासला आहे आणि एखाद्या माणसाप्रमाणे दोन्ही पायावर उभा राहून हा उंदीर अंगाला साबण चोळतो आहे. 

हा व्हिडिओ किती खरा... किती खोटा याची पुष्टी झी २४ तास करत नाही. पण असा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालतोय हे मात्र नक्की. 

 

viral video : पाल घेतेय चहाचा आस्वाद

अनेकांना किचनमध्ये अन्नपदार्थ उघडे ठेवण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

एका पालीचा व्हिडीओ सध्या यूट्यूब, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्या पालीला पाहून भले भले घाबरतात अशी एक पाल कपवर उभी राहून चहाचा आस्वाद घेत असल्याचे व्हिडीओत दिसतेय. 

दरम्यान, हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर करताना किचन जेवण उघडे ठेवल्यास काय होईल असा काहीसा सल्लाही यातून देण्यात आलाय. ज्यांना अन्न झाकून ठेवण्याचा कंटाळा येतो अशा लोकांनी जरुर पाहा हा व्हिडीओ असे व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय. 

दरम्यान, या व्हिडीओ कितपत खरा आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.