स्मार्टफोन घेताय, 'या' फोनवर मिळतोय बंपर Discount

खरंच इतकं मोठा डिस्काऊंट मिळतोय, तुम्ही स्मार्टफोनवरची ऑफर पाहिलीत का?

Updated: Aug 20, 2022, 10:22 PM IST
 स्मार्टफोन घेताय, 'या' फोनवर मिळतोय बंपर Discount  title=

मुंबई : देशभरात अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात. या नवनवीन स्मार्टफोन अनेक ऑफर्स देखील येत असतात. आता अशाच एका स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर मिळतेय. त्यामुळे या स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ऑनलाईन साईटवर गर्दी होतेय. हा स्मार्टफोन नेमका कोणता आहे? व या स्मार्टफोनवर ऑफर काय आहे ते जाणून घेऊयात.  

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन साऱख्या अनेक ऑनलाईन वेबसाईटवर स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट देत असतात. आता Realme 9 Pro 5G स्मार्टफोनवर जोरदार डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर या साईटवर तुम्हाला स्मार्टफोन चांगली ऑफर आहे. 

ऑफर काय?
फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची खरी किंमत 18,999 रुपये सांगितली जात असली तरी ग्राहक यावर 3000 रुपयांची अतिरिक्त बचत देखील करू शकतात. HDFC कार्डवर 1000 रुपयांची सूट देत आहे, तर इतर कार्डवर कंपनी 2000 रुपयांची बचत करण्याची संधी देत आहे. अशा स्थितीत, एकूणच त्याची किंमत 15,999 बनते जी 21,999 च्या मूळ किंमतीपेक्षा 6000 रुपये कमी आहे.अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी ही एक चांगली ऑफर आहे. यासह, कंपनी कंपनीच्या फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के अतिरिक्त कॅश बॅक ऑफर करत आहे.

फिचर्स

  • हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित आहे. 
  • 6.6-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले 
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर 
  •  8GB पर्यंत RAM चा पर्याय 128GB स्टोरेज 
  • कॅमेरा सेटअप 64MP प्राथमिक 8MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2MP मॅक्रो लेन्स, 16MP सेल्फी कॅमेरा
  • साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर 
  • 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट

दरम्यान स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असणाऱ्यांना हा एक चांगला पर्याय आहे. वरील ऑफऱ घेऊन तुम्ही स्वस्तात मिळवून शकता हा स्मार्टफोन.