100MP कॅमेरा, 24GB RAM आणि 1TB मेमरी; Realme ने लाँच केले दोन जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी

Realme Narzo 60 Pro 5G मध्ये 6.7-इंचाचं फूल HD+ सुपरएमोलेड कर्व्ड डिस्प्ले आहे. त्याचं रिजोल्यूशन 2,400 x 1,080 पिक्सेल आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 6, 2023, 06:42 PM IST
100MP कॅमेरा, 24GB RAM आणि 1TB मेमरी; Realme ने लाँच केले दोन जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी title=

Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme Narzo 60 5G सीरिजमध्ये स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये  MediaTek Dimensity प्रोसेसर आहे. तसंच 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध असून तुम्ही प्री-ऑर्डर करु शकता. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये नेमके काय फिचर्स आहेत हे जाणून घ्या...

Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G ची किंमत किती?

Realme Narzo 60 5G के 8GB + 128GB व्हेरियंटसाठी 17 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.  

दरम्यान, Realme Narzo 60 Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 23 हजार 999 इतकी आहे. तर 12GB + 256GB व्हेरियंटची किंमत 26 हजार 999 इतकी आहे. दरम्यान 12GB + 1TB व्हेरियंटसाठी 29 हाजर 999 रुपये मोजावे लागणार आहेत. 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रंगाचा पर्यायही आहे. 60 5G मोबाइल Cosmic Black आणि Mars Orange रंगात उपलब्ध आहे. तर 60 Pro 5G मोबाइल Cosmic Night आणि Martian Sunrise रंगात उपलब्ध आहे. 

दोन्ही स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. आज दुपारी 1 वाजल्यापासून ही सुविधा सुरु झाली आहे. तसंच दोन्ही स्मार्टफोन 15 जुलैपासून अॅमेझॉन प्राइम डे 2023 सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. प्री-ऑर्डर ऑफरमध्ये ग्राहकांना  Narzo 60 5G वर 1000 रुपयांचं कूपन मिळणार आहे. तसंच Narzo 60 Pro 5G खरेदी करताना पैसे भरण्यासाठी आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1500 रुपयांची तात्काळ सूट मिळेल. हा स्मार्टफोन Realme India च्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. 

Realme Narzo 60 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 60 5G मध्ये 6.43 इंचाचा फूल एचडी + SuperAMOLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2,400 x 1,080 पिक्सेल आणि 90Hz रीफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. हा फोन MediaTek Dimensity 6020 SoC वर काम करतो. 

Realme Narzo 60 5G मध्ये 16GB रॅम आहे.  ज्यामध्ये 8GB फिजिकल  रॅम आणि 8GB व्हर्च्यूअल रॅम आहे. तसंच 256 GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसंच, 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme Narzo 60 Pro 5G के फीचर्स और स्पेसिफिकेशंस

Realme Narzo 60 Pro 5G मध्ये 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल HD+ SuperAMOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. या फोनमध्ये 24GB रॅम आहे, ज्यामध्ये 12GB फिजिकल रॅम आणि 12GB डायनॅमिक रॅम आहे. 

त्याचबरोबर 1TB इनबिल्ड स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तसंच 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन MediaTek Dimensity 7050 5G SoC ने सुसज्ज आहे.