रिलायन्स जिओचा धमाकेदार 'हॅप्पी न्यू इयर २०१८ प्लॅन' घोषित

रिलायन्स जिओचा स्मार्टफोन आणि डाटा प्लॅनमुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खूपच खळबळ उडाली. 

Updated: Dec 22, 2017, 09:10 PM IST
रिलायन्स जिओचा धमाकेदार 'हॅप्पी न्यू इयर २०१८ प्लॅन' घोषित   title=

मुंबई  : रिलायन्स जिओचा स्मार्टफोन आणि डाटा प्लॅनमुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खूपच खळबळ उडाली. 

हॅप्पी न्यू इयर २०१८ प्लॅन  

रिलायंस जिओच्या प्रीपेड ग्राहकांनी शुक्रवारी दोन नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनला ' हॅप्पी न्यू इयर २०१८ प्लॅन' असे घोषित करण्यात आले आहे.  या मधील एक प्लॅन १९९रूपयांचा तर दुसरा २९९ रूपयांचा प्लॅन घोषित केला आहे.  

काय आहे प्लॅन  

१९९ च्या प्लॅनमध्ये प्राईम ग्राहकांना २८ दिवसांसाठी प्रतिदिन १.२ जीबी ४ जी डाटा मिळणार आहे. तर २९९ च्या प्लॅनमध्ये जिओच्या प्राईम ग्राहकांनाअ प्रअतिदिन २ जीबी ४ जी डाटा मिळणार आहे. हा प्लॅनदेखील २८ दिवसांचा असेल. सोबतच  ग्राहकांना सारे जिओ अ‍ॅप, व्हॉईस कॉल आणि एसएमएस निशुल्क मिळणार आहेत. 

यासोबतच जिओचा ३९९,४९९,४५९,५०९ रूपयांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्याची व्हॅलिडीटी, डाटा आणि फायदे हे वेगवेगळे आहेत.