फसवणूक टाळण्यासाठी रिलायन्स जिओचा ग्राहकांना इशारा...

रिलायंस जिओने क्रिप्टो करेंसीबद्दल नवीन सूचना जाहिर केल्या आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 1, 2018, 03:55 PM IST
फसवणूक टाळण्यासाठी रिलायन्स जिओचा ग्राहकांना इशारा... title=

नवी दिल्ली : रिलायंस जिओने क्रिप्टो करेंसीबद्दल नवीन सूचना जाहिर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्स आणि काही वेबसाईट्सनुसार  JioCoin अॅप लॉन्च केल्याची चर्चा आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांना क्रिप्टोकरेसीत इनवेस्ट करण्यास सांगितले जात आहे. मात्र हे अॅप युजर्सने डाऊनलोड करु नये, अशी सूचना रिलायंस जिओकडून देण्यात येत आहे.

युजर्सची फसवणूक केली जात आहे

कंपनीने सांगितले की, रिलायंस जिओने कोणत्याही प्रकारचे असे अॅप सुरू केलेले नाही.   JioCoin नावाचे अॅप फेक असून यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युजर्संना फसवण्यासाठी हे करण्यात येत असून याविरूद्ध कारवाई करण्यात येईल.

 प्ले स्टोरवर २२ अॅप उपलब्ध

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक लिंक देवून ३१ जानेवारी २०१८ पूर्वी रजिस्ट्रेशन करण्याऱ्यांना जिओकॉईन फ्री मिळेल, असा दावा करण्यात येत होता. JioCoin क्रिप्टो करेंसीच्या नावे सुमारे २२ अॅप उपलब्ध असल्याचे अनेक रिपोर्ट समोर आले होते. ज्यात Jio Coin, Jio Coin Buy आणि Jio Coin Crypto Currency यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. हे अॅप्स १० हजार ते ५० हजार लोकांनी डाऊनलोड केले आहेत. 

 जिओ क्रिप्टोकरेंसीचा फेक प्लॅन

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धूम केल्यानंतर रिलायंस जिओ क्रिप्टोकरेंसी आणण्याचा प्लॅन करत आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी लीड करेल. त्याचबरोबर काही व्हायरल मेसेजेसमधून जिओ कॉइन १०० रुपयात लॉन्च करण्याचा दावा देखील केला जात होता. मात्र हे सर्व खोटे असल्याचे रिलायंस जिओकडून सांगण्यात येत आहे.