Jio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!

Reliance Jio Freedom offer:  सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 26, 2024, 08:53 AM IST
Jio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर! title=
Jio Air Fiber Offer

Reliance Jio Freedom offer: जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स आणत असतो. जिओने काही वर्षांपूर्वी फ्री कॉलिंगची सेवा देऊन मार्केट दणाणून सोडले होते. दरम्यान कॉलच्या दरात वाढ केल्याने ग्राहक नाराजदेखील झाले आहेत. जिओ प्रत्येक वेळेस आपल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन येत असते. नुकतीच जिओने आपल्या एअरफायबर ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.

नव्या ग्राहकांना फायदा

तुम्ही जिओचे एअरफायबर कनेक्शन घेऊ इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. JIO च्या नव्या ऑफरनुसार तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इन्स्टॉलेशन फीस घेतली जाणार नाही. ही ऑफर विशिष्ट कालावधीसाठी असणार आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. जिओचे सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसाठी ही ऑफर लागू असणार आहे. 

काय मिळणार फायदा?

जे यूजर्स 3 महिन्यांचे ऑल इन वन प्लान निवडतील,त्यांना 3 हजार 121 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. याध्ये 2 हजार 121 रुपयांचा प्लान चार्ज आणि 1 हजार रुपयांचे इंस्टॉलेशन चार्जचा समावेश आहे.फ्रीडम ऑफरसोबतच नव्या युजर्सना या ऑफरअंतर्गत केवळ 2 हजार 121 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. 

एअर फायबर कसे मिळेल?

तुम्हाला एअर फायबर घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जिओची अधिकृत वेबसाइट Jio.com वर जावे लागेल.येथे तुम्हाला जिओ फायबरसाठी तुमचा इंट्रेस्ट नोंदवावा लागेल. किंवा   60008-60008  मिस्ड कॉल द्यावा लागेल. 

JioTag Air झाला लॉन्च 

जिओने नुकतेच जिओ टॅग एअर लॉन्च केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान सोशणे सोपे पडणार आहे. हे एक प्रकारचे ट्रॅकर असून लांबचा प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होतो. जिओने एक परवडणारा स्मार्ट ट्रॅकर आणला आहे. कोणाचे वैयक्तिक सामान हरवल्यास त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याप्रकारे हे डिव्हाइस डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे तुमचे सामान हरवले किंवा चोरीला जाण्यापासून वाचते. या डिव्हाइसमध्ये हरवलेले सामान शोधण्यासाठी नवी ट्रॅकींग सुविधा आहे.कार किंवा विविध वस्तूंमध्ये तुम्ही हे डिव्हाइस लपवून ठेवू शकता.

कधीपर्यंत मिळेल ऑफरचा लाभ?

जिओने आपल्या फ्रीडम ऑफर अंतर्गत एअर फायबर यूजर्ससाठी 30 टक्के सवलतीची घोषणा केली आहे. 26 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान जोडल्या जाणाऱ्या सर्व एअरफायबर यूजर्ससाठी 1000 रुपयांचे शुल्क माफ केले जाणार आहे. झिरो इन्स्टॉलेशन ही ऑफर सर्व एअरफायबर 5जी यूजर्ससोबतच 3,6 महिने आणि 1 वर्षाचा प्लान निवडणाऱ्या सर्व नव्या यूजर्ससाठी लागू असेल. 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.