जिओची zoomला टक्कर; फ्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप लॉन्च

zoom app ला टक्कर...

Updated: Jul 3, 2020, 02:02 PM IST
जिओची zoomला टक्कर; फ्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप लॉन्च
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने Reliance Jio गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप लॉन्च केलं आहे. कंपनीने आपलं नवं फ्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप JioMeet गुरुवारी लॉन्च केलं आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोर आणि ऍप स्टोरमध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप झूमला zoom हे ऍप चांगली टक्कर देऊ शकेल. 

जवळपास एक महिन्यापासून हे ऍप काही यूजर्सला बिटा फॉर्ममध्ये उपलब्ध करुन देण्यात आलं होतं. मात्र आता सर्वांसाठीच हे ऍप उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, JioMeetमध्ये HD व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय zoom प्रमाणेच या ऍपद्वारेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी 100 लोक सहभागी होऊ शकतात.

यूजर्स यासाठी ई-मेल आयडी किंवा फोन नंबरद्वारे साइन-अप करु शकतात. हे ऍप पूर्णपणे मोफत असून यूजर्स एका दिवसांत अनलिमिटेड मीटिंग्स करु शकतात. शिवाय या मीटिंग्स पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहेत आणि zoom प्रमाणे यातही वेटिंग रुमची सुविधा असणार आहे.

क्रोम, फायरफॉक्ससह हे ऍप Windows, Mac, iOS आणि Android वरही डाऊनलोड करता येऊ शकतं. 

या ऍपला अतिशय सोपं इंटरफेस देण्यात आलं असून कंपनीने यात 5 डिवाइसपर्यंत मल्टी-डिवाइस लॉगइन सपोर्ट दिला आहे. कॉल चालू असताना यूजर्स डिवाइस सहज बदलू शकतात. यात स्क्रिन शेअरिंग फिचरही देण्यात आलं आहे