रिलान्यस जिओचा नवा धमाका ; सिम असलेला लॅपटॉप करणार सादर

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाल करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने अजून एक धमाका सादर केला आहे. 

Updated: Apr 12, 2018, 03:17 PM IST
रिलान्यस जिओचा नवा धमाका ; सिम असलेला लॅपटॉप करणार सादर title=

मुंबई : टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाल करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने अजून एक धमाका सादर केला आहे. आता कंपनी सिमकार्ड असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. कंपनी आपला अॅव्हरेज रेव्हून्यूवर युजर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हा सिम कार्ड असलेला लॅपटॉप फायदेशीर ठरेल. रिलायन्स जिओने गेल्या वर्षी ४ जी फिचर फोन लॉन्च केला होता. जिओ लॉन्च झाल्यानंतर तिसऱ्या तिमाहीत  रिलायन्सला ५०० कोटींचा नफा झाला.

क्वालकॉमसोबत लॅपटॉपची निर्मिती

मुकेश अंबानीच्या नेतृत्वात जिओची अमेरिकेची मोठी चिप निर्माता कंपनी क्वालकॉमसोबत बोलणे सुरु आहे. हा लॅपटॉप विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल आणि भारतीय बाजारात हा बिल्ट-इन सेल्युलर कनेक्शन सहित लॉन्च करण्यात येईल. क्वालकॉम पहिल्यांदा 4जी फीचर फोनसाठी जिओ आणि रिलायन्स रिटेलसोबत काम करेल.

सेल्यूअर कनेक्टीव्हीटी मिळेल

क्वालकॉम टेक्नॉलॉजीजचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सिनियर डायरेक्टर Miguel Nunes ने इकोनॉमिक्स टाईम्सला सांगितले की, आम्ही जिओसोबत बोलत आहोत. त्यांचे डिव्हाईस घेऊन डेटा आणि कॉन्टेंटचा लाभ घेऊ शकता. याशिवाय चिपनिर्माता Internet of Things (IoT)ब्रॅंड स्मार्ट्रोनसोबत सेल्यूलर कनेक्टिव्हिटी असलेल्या स्नॅपड्रेगन ८३५ असलेल्या लॅपटॉप आणण्याचे बोलले जात आहे. स्मार्ट्रोनने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.

जगभरातून टेक्नॉलॉजीला मागणी

क्वालकॉम पहिल्या दुनियेत दिग्गज कंपन्या एचपी, आसुस आणि लेनोव्हा सारखे लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्या एकत्र येऊन काम करत आहेत. याशिवाय दुनियेच्या १४ मोठ्या ऑपरेटर्सने ही नवीन या तंत्रज्ञानाशी जोडण्यात रुची दाखवली आहे. यात वेरिजोन, AT&T आणि स्प्रिन्ट्स सारख्या कंपन्या सहभागी आहेत. याशिवाय जर्मनी, इटली, युके, फ्रॉन्स आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातील ऑपरेटर्संना हे तंत्रज्ञान हवे आहे.

जिओने दिली नाही माहिती

मात्र जिओकडून याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. जिओने देशभरात रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून वायफाय डॉंगल्स, लाईफ स्मार्टफोन्स आणि ४ जी फिचर फोन यांची विक्री करत आहेत. काऊंटरपॉईंट रिसर्च डिरेक्टर नील शहानुसार, सिम कार्ड असलेल्या लॅपटॉपच्या साहाय्याने ऑपरेटर्सला ARPU वाढवण्यासाठी मदत मिळेल. भारतात सुमारे पन्नास लाख लॅपटॉप प्रत्येक वर्षी विकले जातात. यातील अधिकतर लोक होम किंवा पब्लिक वायफायच्या माध्यमातून कनेक्ट केले आहे.