मुंबई : रिलायन्स जिओने 15 ऑगस्टपासून जिओ गीगा फायबरचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे. यासोबतच मुकेश अंबानी यांची कंपनी ब्रॉडबँड सर्व्हिसच्या बाजारात पदार्पण करत आहे. या अगोदर या कंपनीकडून ब्रॉडबँड सेवा पुरवली जात नाही. जिओ गीगी फायबर देशाच्या 1100 शहरांमध्ये आपली सेवा पुरवणार आहे.
जिओ गीगा फायबर ही सेवा एका सामान्या ब्रॉडबँड सेवेपेक्षा अधिक चांगली आहे. यामध्ये ब्रॉडबँडसोबतच आयटीपीवी, लँडलाईन, व्हिडिओ कॉन्फ्रसिंग आणि वर्जुअल रिअॅलिटीची सुविधा देणार आहे.
गीगा फायबरची घोषणा झाल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की, हे सर्वाधिक महाग असणार आहे. मात्र रिलायन्सने याची सुरूवात 500 रुपयांपासून केली आहे. आता जिओने आपल्या अधिकाधिक प्लानची घोषणा केली आहे. ज्या ग्राहकांना जिओ गीगा फायबरकरता रजिस्ट्रेशन माय जिओ अॅपवर करू शकता. तसेच जिओच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहक गीगा फायबरचं रजिस्ट्रेशन करू शकतात.
जिओ गीगा फायबर सब्सक्रायब करणाऱ्या ग्राहकांना रायटलला आणि जिओ गीगाच्या माध्यमातून सुविधा दिली जाणार आहे. जिओ गीगा रायटरला अशा पद्धतीने असं डिझाइन केलं आहे की 1GBPS पर्यंतचा स्पीड देण्यात आला आहे. याचा दुसरं डिवाइस आहे सेट अप बॉक्स, ज्याला जिओ गीगा टीव्ही सांगितलं जातं आहे. हा सेट अप बॉक्स ग्राहकांना 600 हून अधिक चॅनल देणार आहेत. यावर ग्राहक हजारो फिल्म पाहू शकतात. तसेच असंख्य गाणी देखील ऐकू शकतात.