रितेश देशमुखचा रायगडावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल...

अभिनेता रितेश देशमुखचा रायगड किल्ल्यावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 13, 2018, 07:50 PM IST
रितेश देशमुखचा रायगडावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल... title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा रायगड किल्ल्यावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेता रितेश देशमुखवर यापूर्वी रायगडावर शिवाजी महाराजांच्या पायाशी बसून फोटो काढल्याने टीका झाली होती, त्यावर रितेश देशमुखने कोणताही विचार न करता, संवेदनशीलपणा दाखवत माफी मागितली होती. मात्र त्यानंतर रितेश देशमुखचा रायगडवरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रितेश देशमुखचं कौतुक होत आहे, पण या व्हिडीओच्या निमित्ताने एक महत्वाची बाब समोर आली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रात आजही नेत्यांना जास्त आणि अभिनेत्यांना कमीच ओळखतात. कारण रितेश देशमुखने रायगडावर भेट देणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाशी चर्चा गेली. चर्चेनंतर अखेर एका तरूणाने रितेश देशमुख हे विलासराव देशमुख यांचे चिरंजीव असल्याची ओळख करून दिली, तेव्हा पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याने रितेश देशमुख यांना शेकहॅण्ड केलं.