मुंबई : अमेरिकेतील मोटरसायकल रेसर आणि आयकॉनिक डिझाइनर रोनाल्ड सॅड्सने १९७४ साली बाइक यामाहा आरडी ४०० ला घेतलं आणि काही बीस्पोक पार्टस आणि लाइफटाइम एक्सपिरियन्सच्या मदतीने एक अशी बाइक कस्टमाइज केली आहे. ज्या बाइकला बघून तुम्ही तोंडात बोटं घालाल.
४३ वर्षाच्या रोलँडच्या माहितीनुसार, फिटनेस, फिनिश आणि डिटेलिंगप्रमाणे एक पर्फेक्ट बाइक आहे. या बाइकचं कंस्ट्रक्शन, वेल्डिंग, पेंट, मेटल फॅब्रिकेशन आणि क्वॉलिटी सगळं काही अतिशय सुंदर आहे. ही एक युनिक कस्टमाइज बाइक आहे. रोलँड सँडसजवळ एक टिझाइम टिम आहे. जी टिम बाइक्सला कस्टमाइज करते. मात्र ही बाइक स्वतः रोलँडने तयार केली आहे. यामध्ये त्याने स्वतः फैब्रिकेशनचं काम केलं आहे
गेल्या अनेकवर्षांपासून विटेंज मॉडेल्सच्या अगदी कठिण पद्धतीने मिळणाऱ्या बाइरचे पार्टस् एकत्र करून या बाइकला तयार केलं आहे. रोनाल्डने स्वतः या बाइकच्या इंजिनवर काम केलं आहे. त्याने १९७४ ची यामाहा आरडी ४००चे एअर कूल्ड ३९९ सीसी टू स्ट्रोक स्ट्रेक ट्विन इंजिन घेतलं आणि पुन्हा त्याला आपल्या पद्धतीने तयार केलं आहे.
या बाइकमध्ये रोनाल्डने १९९७ची बाइक यामाहा टीजे २५०मधून चेसिसची फ्रेम घेतली आहे. रोलँडच्या माहितीनुसार ही जगातील सर्वात बेस्ट चेसिस आहे. यामाहा टीजे २५० शी यासाठी रोलँडचा खास लगाव आहे. कारण हीच त्याची पहिली बाइक होती. विटेंज यामाहा आरडी ४०० चे इंजिन कस्टमाइज बाइकमध्ये लावण्यात आले आहे. या बाइकला वजनाने कमी करण्यासाठी वाटर पम्प आणि रॅडिएटर्स हटवण्यात आले आहेत.