मुंबई : रॉयल एनफील्ड बुलेटही जवळ-जवळ सर्वांची आवडती गाडी आहे, जी अनेक दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. त्यामुळे तरुणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत बहुतांश लोक ही गाडी घेण्याकडे वळतात. तर काही वेळा सगळेच घेतात म्हणून अनेक लोक ही गाडी घेण्यासाठी हट्ट धरतात. परंतु तुम्हाला माहितीय का की, रॉयल एनफिल्ड बुलेट प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही. जर लॉजिकली विचार केला तर ती बुलेट असो किंवा कोणतीही बाईक असो, ती सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेलच असे नाही. गाड्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांच्या डिझाइनपासून ते त्याचं माइलेज आणि स्पीड सगळंच वेगवेगळं असतं.
जेव्हा एखादी व्यक्ती नवीन बाईक विकत घेते तेव्हा त्याच्या काही अपेक्षा असतात, जसे समजा की, तुम्ही बाईक विकत घेता तेव्हा तुम्हाला ती जास्त मायलेजवाली गाडी हवी आहे किंवा अशी गाडी जिचा मेटेनन्स खर्च कमी असेल इत्यादी. अशा परिस्थितीत जर तुम्ही रॉयल एनफिल्डची बुलेट खरेदी करणार असाल, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
त्यामुळे आज आम्ही Royal Enfield Bullet बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही ही गाडी विकत घेऊ शकता. जर तुम्हाला या गोष्टी पटल्या तर ठिक, पण जर नाही पटल्या तर तुम्ही तिला विकत घेण्याचा विचार न केलेलंच बरं.
मायलेज
जर तुम्हाला तुमच्या नवीन बाईककडून जास्त मायलेजची अपेक्षा असेल तर हे लक्षात घ्या की, बुलेटमध्ये ते शक्य नाही. बुलेटचे इंजिन 350 cc चे आहे, म्हणजेच त्याचे इंजिन मोठे आहे आणि मोठे इंजिन असल्यामुळे ते कमी मायलेज देते. त्यामुळे तुम्हाला ही गाडी चालवणे खूपच खर्चिक पडू शकते.
कमी वजनाची गाडी
जर तुमचं वजन जास्त नसेल, तर तुम्ही या गाडिचा विचार करुच नका, कारण ही गाडी खूप जड आहे. त्यामुळे गाडीला चालवणे सोपे नाही. इतकंच काय तर समजा ही गाडी कुठे पडली किंवा तिला ढकलण्याची वेळ आली, तर तुम्हाला ते कधीही जमणार नाही.
अशावेळी तुम्ही एखाद्या हलक्या गाडीच्या पर्यायाचा विचार करावा.
कमी खर्चिक आणि कमी खर्चात सर्व्हिस देणारी गाडी
रॉयल एनफील्ड बुलेट हे लक्झरी उत्पादन मानले जाते, कारण लोकांनी ते स्टेटस सिम्बॉल म्हणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याची सर्व्हिसिंगची किंमतही जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही गाडी घेतलात तर लक्षात ठेवा की, तुम्हाला भविष्यात त्याच्या सर्विसिंगचा देखील जास्त खर्च येणार आहे.
बाईक अॅक्सेसरीज
रॉयल एनफिल्ड बुलेटची अॅक्सेसरीज हे खूप महाग आहे. जर तुम्हाला अशी बाइक घ्यायची असेल ज्याचे सामान किंवा पार्ट्स स्वस्त असेल, तर तुम्ही या बुलेटचा विचार न केलेलाच बरा