Royal Enfield आणि JAWA यापैकी एक निवडायची आहे का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बाइकप्रेमींची प्रीमियम मोटारसायकलला पसंती देतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड आणि जावा बाइकचा समावेश आहे. पण यापैकी कोणती बाइक निवडयाची? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडतो.

Updated: Jul 27, 2022, 08:04 PM IST
Royal Enfield आणि  JAWA यापैकी एक निवडायची आहे का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स title=

Royan Enfield And JAWA Bikes: बाइकप्रेमींची प्रीमियम मोटारसायकलला पसंती देतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड आणि जावा बाइकचा समावेश आहे. पण यापैकी कोणती बाइक निवडयाची? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडतो. देशात दोन्ही कंपन्यांच्या बाइक चाहत्यांची मोठी फौज आहे.  रॉयल एनफील्‍डची कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि जावा पेराक या कंपनीच्‍या सर्वात महागड्या बाइक आहेत. चला तर या बाइकबद्दल जाणून घेऊया.

Royal Enfield Continental GT 650

रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी 650 या बाइकची एक्स-शोरूम किंमत 3.06 ते 3.32 लाख रुपये आहे. ही बाइक स्टाइल आणि डिझाइनमध्येही जबरदस्त आहे.रॉयल एनफील्‍ड कॉन्टिनेंटल जीटी  650 मध्ये 4-स्ट्रोक, 648 सीसी इंजिन आहे. त्याचे 6-स्पीड इंजिन 47 एचपी पॉवर देते आणि 52 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.रॉयल एनफील्‍ड कॉन्टिनेंटल जीटी  650  बाइकचा ग्राउंड क्लीयरन्स 174mm आहे. बाइकची लांबी 2122 मिमी आहे. कंपनी या बाइकच्या खरेदीवर 2 वर्षांसाठी मोफत वॉरंटी देखील देत आहे. एकूण वजन 202 किलो आहे.  

JAWA PERAK

जावा मोटरसायकलची जावा पेराक ही सर्वात महागडी बाइक आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये आहे. ही मोटरसायकल तुम्ही पाच रंगांमध्ये खरेदी करू शकता. जावा पेराक मोटरसायकल 334 सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे जी 30.64 पीएस पॉवर आणि 32.74 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. तुम्ही 10000 भरूनही गाडी बुक करू शकता. ही रक्कम रिफंडेबल आहे. ही बाइकची आकर्षक असून खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला टेस्ट राइड हवी असल्यास तुम्ही ती ऑनलाइन बुक करू शकता.