टाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी

2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Updated: Jul 27, 2022, 06:41 PM IST
टाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी  title=

Maruti Wagon R India Number 1 Car In Last Six Months: गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस गाड्या देशात लाँच झाल्या आहेत. त्यामुळे कारप्रेमींकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे. 2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे. टॉप 10 कारच्या यादीत मारुतिच्या एकूण 7 मॉडेलचा समावेश आहे. मात्र गेल्या सहा महिन्यात कारप्रेमींनी सर्वाधिक पसंती दिली ती मारुतिच्या वॅगनआर गाडीला. वॅगनआर हॅचबॅकच्या 1,13,407 युनिट्सची विक्री झाली असून क्रमांक 1 वर विराजमान झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 19.58 टक्क्यांची वाढ झाली आहे. मारुति स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर कॉम्पॅक्ट सेडान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्विफ्टने 91,177 वाहनांची तर डिझायरने 85,929 वाहनांची विक्री केली आहे.

टाटाची नेक्सॉन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही चौथ्या क्रमांकावर राहिली. टाटाच्या नेक्सॉन सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या 82,770 गाड्यांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये पहिल्या सहा महिन्यात 46,247 गाड्यांची विक्री झाली होती. नेक्सॉनने वार्षिक 78.97 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 

मारुतीची वॅगनआर हॅचबॅक 1.0 लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. वॅगनआरची किंमत रु. 5.47 लाख ते रु. 7.20 लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही गाडी सीएनजी 1.0 लिटरमध्ये 34.05 किमी आणि पेट्रोल एजीएस 1.0 लिटरमध्ये 25.19 किमी मायलेज देते.