Flipkart सोडल्यानंतर मालक सचिन बंसल यांची इमोशन पोस्ट

भारतीय ऑनलाइन बाज़ारात याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. 

Updated: May 11, 2018, 10:53 AM IST
Flipkart सोडल्यानंतर मालक सचिन बंसल यांची इमोशन पोस्ट title=
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट आणि भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये डील फायनल झाली आहे. वॉलमार्ट १.०७ लाख कोटी रूपयात ७७ टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट यांच्यात झालेल्या करारानंतर वेगळे झालेले सहसंस्थापक सचिन बंसल यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. मोठ्या काळापासून राहिलेल्या कामांसाठी आपला वेळ देणार असल्याच त्यांनी सांगितल. माझ इथल काम पूर्ण झालय आणि दहा वर्षांनी आता फ्लिपकार्टची कमान दुसऱ्यांकडे देण्याचा आणि इथून जाण्याची वेळ आली आहे. फ्लिपकार्ट प्रमुख कल्याण कृष्णमूर्ती आणि फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बंसल सध्या कंपनीत कायम आहेत. भारतीय ऑनलाइन बाज़ारात याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. सध्या भारताचा ४० टक्के ऑनलाईन बाजार प्लिपकार्टच्या नियंत्रणाखाली आहे.

गेमिंग क्षेत्रावर नजर 

 बंसल आता गेमिंग क्षेत्रावर लक्ष देणार असल्याचे सांगितले जात आहे. मुलांना सध्या काय खेळायला जास्त आवडेल ? तसेच त्यांच कोडिंग कौशल्य अधिक निखारल जाणार आहे. 

दुसऱ्याला अधिकार देण्याची वेळ 

दहा वर्षांनी इथून जाण्याची आणि दुसऱ्याकडे कमान देण्याची वेळ आली आहे. बाहेर राहून ते फ्लिपकार्टच्या टीमचा उत्साह वाढवणार आहेत. तसेच वृद्धीमध्ये सातत्य राखण्यावर लक्ष देणार आहेत. 

२ वर्षांपूर्वीच झाले वेगळे 

सचिन बंसल आता पूर्णपणे कंपनीपासून वेगळे होत आहेत. पण जानेवारी २०१६ मध्ये सीईओ म्हणून राजीनामा देत स्वत: ला कामापासून वेगळ केलं होत. पण फ्लिपकार्टच्या गुंतवणूक संदर्भातील घडामोडींमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत असत.