एक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!

भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 29, 2024, 01:53 PM IST
एक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं! title=

भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे. 

वंध्यत्वाशी लढा देत असलेल्या जोडप्यांमध्ये ही एक सामान्य घटना आहे. कारण इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या उपचारांमुळे मानसिक आणि शारीरिक तणाव येऊ शकतो. ज्यामुळे लैंगिक कार्यात बिघाड होतो. तणाव, मधुमेह, हार्मोन्स आणि त्यामधील बदल, ठराविक औषधं आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या समस्यांमुळे जोडप्यांमध्ये लैंगिक समस्या दिसून येतात.

पुण्यातील प्रजनन सल्लागार निशा पानसरे यांच्या सांगण्यानुसार, लैंगिक कार्यात बिघाड येण्यामागच्या कारणांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणं, यकृत निकामी होणं, कर्करोग आणि त्यावरील उपचार, हार्मोनल असंतुलन कारणीभूत ठरू शकतात. याव्यतिरिक्त, काही औषधांचे दुष्परिणाम असतात जे एखाद्याच्या लैंगिक कार्यावर परिणाम करतात. शिवाय, तणाव, चिंता, नैराश्य, लैंगिक समाधान न झाल्याची भावना, वैवाहिक किंवा नातेसंबंधातील समस्या आणि शरीरीत समस्या देखील लैंगिक कार्यात बिघाड निर्माण करतात. वंध्यत्वावर उपचार घेत असलेल्या जोडप्यांसाठी ही समस्या लैंगिक संबंधात अडथळे आणु शकते आणि ल्युब्रिक्रेशन कमी करते ज्यामुळे जोडप्यांना तणावाचा सामना करावा लागू शकतो.

या समस्येमध्ये लक्षणं कोणती आढळून येतात?

लैंगिक ताठरता टिकवण्यास असमर्थ ठरणे किंवा शीघ्रपतन, या समस्यांमुळे शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होऊनही पेनिट्रेशनसाठी इरेक्शन न होणं हे दोन्ही पार्टनरला असंतुष्ट करतात. तसंच शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण करतात. स्त्रियांना संभोग करताना योनिमार्गात कोरडेपणा, कामोत्तेजनाचा अभाव, दोघांचीही लैंगिक इच्छा नसणं, वेदनादायक संभोग आणि उत्तेजनासंबंधी समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती निशा पानसरे यांनी दिलीये.

निशा यांच्या सांगण्यानुसार, कामवासना कमी होणं किंवा संभोग दरम्यान वेदना यांसारख्या परिस्थिती गर्भधारणा अधिक आव्हानात्मक ठरु शकतात. याचं कारण असं की, नियमित लैंगिक क्रियांमध्ये व्यस्त राहण्यास असमर्थ असणं. त्याचप्रमाणे ओव्हुलेशन दरम्यान गर्भाधान होण्याची शक्यता कमी होते. अशावेळी विलंब न करता एखाद्याने तज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे.