'आता किमान ते असं तर म्हणणार नाहीत की..'; टीम इंडियाबद्दल अक्रमची 'खोचक' प्रतिक्रिया

Team India T20 World Cup Squad: 2021 मध्ये भारतीय संघ आयपीएलनंतर थेट वर्ल्डकप खेळण्यासाठी युएईला गेला होता. मात्र या पर्वामध्ये पहिल्याच फेरीत भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 29, 2024, 02:05 PM IST
'आता किमान ते असं तर म्हणणार नाहीत की..'; टीम इंडियाबद्दल अक्रमची 'खोचक' प्रतिक्रिया title=
एका कार्यक्रमात बोलताना अक्रमनं केलं हे विधान

Team India T20 World Cup Squad: रविवारी म्हणजेच 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने इंडियन प्रिमिअर लीग 2024 चा चषक उंचावला आणि आयपीएलची सांगता झाली. शेवटच्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा या चषकावर नाव कोरलं. चेन्नईत झालेल्या या सामन्यात सनरायझर्सच्या संघाने 113 धावांपर्यंत मजल मारता आली. ही धावसंख्या कोलकात्याने 8 विकेट्स आणि 57 बॉल राखत गाठली.

फायनलमध्ये एकही असा खेळाडू नव्हता जो...

सनरायझर्सच्या संघाने संपूर्ण आयपीएल आपल्या फलंदाजीने गाजवलं. त्यांनी दोनदा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. मात्र अंतिम सामन्यात त्यांना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. अँड्र्यू रस्सेलने 3 तर मिचेल स्ट्रार्क, ऋषित राणाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे या आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये जून महिन्यात सुरु होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघात असलेला एकही खेळाडू नव्हता. अर्थात राखीव खेळाडू असलेला रिंकू सिंह हा केकेआरमधून खेळला. मात्र त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही असा खेळाडू केकेआर किंवा सनरायझर्सच्या संघात नव्हता जो पुढील वर्ल्डकपही खेळणार आहे. 'स्पोर्ट्सकीडा क्रिकेट'शी बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने याचकडे लक्ष वेधलं आहे.

आता असं कोणी म्हणणार नाही...

वर्ल्डकप 2024 खेळणार एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नव्हता हे खरं तर वरदान असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी अक्रमने भारतीय संघाला खोचक टोलाही लगावला आहे. "आता त्यांच्यापैकी कोणालाही आम्ही थकलो होतो असं म्हणता येणार नाही," असं म्हणत वसीम अक्रमने वाईट कामगिरी झाली तर त्यासाठी आता भारतीय खेळाडूंना आयपीएलचं कारण देता येणार नाही असं सूचत करायचं होतं. "आयपीएल कदाचित ते असाही विचार करत असतील की अंतिम सामन्यात पोहचून काय फायदा कारण भारतीय संघ हा जास्त महत्त्वाचा आहे. आपण इथे खेळण्यापेक्षा देशासाठी खेळू असं त्यांचं म्हणणं असेल. मात्र ही गोष्ट भारतीय संघासाठी वरदान ठरु शकते," असं अक्रम म्हणाला आहे.

नक्की वाचा >> रितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'

ते थकलेले असतील पण...

"मागच्या एका कार्यक्रमामध्ये मी खेळाडू थकलेले असतील असं म्हणत चिंता व्यक्त केलेली. ते थकलेले असतील यात शंका नाही. अमेरिका त्यांच्यासाठी फार परिचयाचा नाही. मला वाटतं डाल्समध्ये पाकिस्तानविरुद्धचा त्यांचा पहिला सामना होणार आहे. ते तिथे (अमेरिकेत) जाऊन आता दोन सराव सामने खेळतील. मला वाटतं हे त्यांना सेटल होण्यासाठी पुरेसं आहे. हे टी-20 क्रिकेट आहे. खेळाडू रिकव्हर होतील. सध्या फिटनेसचा स्तर हा फार उत्तम असतो," असंही अक्रम म्हणाला.

नक्की वाचा >> 'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू स्पष्टच बोलला

भारताचा पहिला सराव सामना कधी?

भारताचा संघ टी-20 वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्कला पोहचला आहे. भारत पहिला सराव सामना 1 जून रोजी खेळणार आहे. हा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. 2021 मध्ये भारतीय संघ आयपीएलनंतर थेट वर्ल्डकप खेळण्यासाठी युएईला गेला होता. मात्र भारतीय संघ या पर्वात पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता.