Smartphone चाहत्यांसाठी खूशखबर! Samsung ची 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट, तब्बल 15 हजारांनी स्वस्त केला फोन

Samsung Galaxy S22 Price Cut: सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S22 च्या किंमतीत मोठी घट केली आहे.आता हा स्मार्टफोन जवळपास 15 हजारांनी स्वस्त झाला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 19 हजारांपर्यंत खरेदी करु शकता. Galaxy S23 सीरिज लाँच होताच ही घट करण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व माहिती

Updated: Feb 3, 2023, 11:40 AM IST
Smartphone चाहत्यांसाठी खूशखबर! Samsung ची 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट, तब्बल 15 हजारांनी स्वस्त केला फोन  title=

Samsung Galaxy S22 Price Cut: Samsung ने आपले नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Galaxy S23 सीरिज लाँच होताच कंपनीने आपल्या जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली आहे. सॅमसंगने Galaxy S22 ची मूळ किंमत कमी केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 15 हजारांनी स्वस्त केला आहे. कंपनीने Galaxy S22 स्मार्टफोन लाँच केला तेव्हा त्याची किंमत 72 हजार 999 रुपये इतकी होती. 

दुसरीकडे फ्लॅगशिप मॉडेल Galaxy S23 ला कंपनीने 74 हजार 999 रुपयांमध्ये लाँच केलं आहे. ही किंमत बेस व्हेरियंटची आहे. जर तुम्हाला फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Galaxy S22 ला तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करु शकता. जाणून घ्या यांच्या नव्या किंमती काय आहेत. 

Samsung Galaxy S22 ची नवी किंमत किती?

सॅमसंगने आपल्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत 15 हजारांनी कमी केली आहे. आता तुम्ही याचा बेस व्हेरियंट 57 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन लाँच झाला तेव्हा 72 हजार 999 रुपये किंमत होती. ही किंमत स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची आहे. 

दुसरीकडे स्मार्टफोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंट 61 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. यासाठी आधी 76 हजार 999 रुपये मोजावे लागत होते. तुम्ही हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेसबाईट किंवा फ्लिपकार्ट येथे खरेदी करु शकता. 
 
Flipkart वर तुम्ही Galaxy S22 5G ला 53 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता. सध्या हा फोन 53,490 रुपयांत उपलब्ध आहे. Samsung Axis Bank क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 10 टक्के सूट देत आहे.

हा फोन खरेदी करावा का?

Samsung Galaxy S22 एक चांगला स्मार्टफोन आहे. ज्यांना कॉम्पॅक्ट स्मार्टफोन हवा आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये युजर्सला AMOLED Screen, Qualcomm Snapdragon प्रोसेसर आणि पूर्ण दिवस टिकू शकते अशी बॅटरी मिळते.

फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन Android 13 वर अवलंबून असणाऱ्या One UI वर काम करतो. तसंच 50MP + 12MP + 10MP चा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटला 10MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 25W ची वायर्ड चार्जिंग असून वायरलेस चार्जिंग सपोर्टसह हा उपलब्ध आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.