ड्युअल कॅमे-यासोबत नव्या अवतारात लाँच होणार गॅलक्सी जे7 प्लस

फोन निर्मिती करणा-या दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनी आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंग कंपनीने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर आता गॅलक्सी जे 7 प्लस लाँच करत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 26, 2017, 06:34 PM IST
ड्युअल कॅमे-यासोबत नव्या अवतारात लाँच होणार गॅलक्सी जे7 प्लस title=
File Photo

नवी दिल्ली : फोन निर्मिती करणा-या दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनी आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंग कंपनीने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर आता गॅलक्सी जे 7 प्लस लाँच करत आहे.

सॅमसंगचा हा नवा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे फिचर्स लीक झाले आहते. या नव्या फोनमध्ये गॅलक्सी नोट 8 प्रमाणे ड्युअल कॅमेरा असणार आहे. एक नजर टाकूयात या फोनच्या फिचर्सवर...

थायलंडची वेबसाईट थाय मोबाईल सेंटरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, गॅलक्सी जे7 प्लस हा फोन प्रसिद्ध गॅलक्सी जे फोनचं नविन व्हर्जन असणार आहे. यामध्ये नवं आयएसओसेस ड्युअल इमेज सेंसर्स असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर 2.4 गिगाहट्ज अँड्रॉइड 7.1.1 नूगा ऑपरेटींग सिस्टमसोबत असणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी जे7 प्लस या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल, ए/1.7 अॅपेरचरसोबत 5 मेगापिक्सल एफ/1.9 सेंसरही या फोनमध्ये असणार आहे. तर सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असणार आहे. हा फोन काळ्या, गुलाबी रंगांत उपलब्ध असणार असल्याचं बोललं जात आहे.