केवळ ४९० रुपयांना मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन...

फेस्टिव्हल सीझन येताच ऑनलाईन मार्केटमध्ये ऑफर्सचा धबधबा सुरू झालाय. 

Updated: Aug 5, 2017, 10:41 PM IST
केवळ ४९० रुपयांना मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन... title=

नवी दिल्ली : फेस्टिव्हल सीझन येताच ऑनलाईन मार्केटमध्ये ऑफर्सचा धबधबा सुरू झालाय. 

फ्लिपकार्ट, अमेझॉन यांसारख्या अनेक ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव्ह सेल्समध्ये ग्राहकांना दमदार डिल्स देतायत. यामध्ये मोबाईल, कम्प्युटर, फॅशन, किचन आयटम्सवर मोठी सूट मिळतेय. यादरम्यान सॅमसंगचा जे३ प्रो हा स्मार्टफोन केवळ ४९० रुपयांना मिळतोय.

...ही आहे अट

सॅमसंग गॅलेक्सी जे३ प्रो या स्मार्टफोनची किंमत ८४९० रुपये आहे. यावर ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट सध्या मिळतोय. त्यामुळे हा मोबाईल ७९९० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. शिवाय या फोनवर ७५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जातेय. ग्राहकांना पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यु मिळाली तर हा फोन तुम्हाला केवळ ४९० रुपयांना मिळू शकेल. 

इतकंच नाही तर जिओ युझर्सना ६० जीबी डाटा दिला जातोय. युझर्स ३९९ रुपयांच्या ६ रिचार्जवर या डाटा प्लानचा लाभ घेऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर १० जीबी अतिरिक्त डाटा दिला जाईल.