कोणी तयार केला QR Code? गंमत वाटेल, पण त्याच्या जन्माची कहाणी एकदा पाहाच

तरी ही इवलीशी गोष्ट बरीच कामाची आहे.   

Updated: Jan 25, 2022, 05:42 PM IST
कोणी तयार केला QR Code? गंमत वाटेल, पण त्याच्या जन्माची कहाणी एकदा पाहाच  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कोणतंही सामान खरेदी करण्यापासून ते अगदी काही ऑर्डर करेपर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला एक क्यूआर कोड देण्यात येतो. हा क्यूआर कोड म्हणजे काय, तर एका चौकोनात लहानलहान चौकोनांचा मिळून झालेली एक मोठी चौकट. 

हा क्यूआर कोड पाहताक्षणी काहीच लक्षात आला नाही, तरी ही इवलीशी गोष्ट बरीच कामाची आहे. 

क्यू आर कोड (QR Code)चं फुलफॉर्म आहे क्विक रिस्पॉन्स कोड. या एका कोडमध्ये वस्तूच्या किमतीपासून ती कोणी बनवली, त्यात कोणकोणते गुणधर्म आहेत इथपर्यंतची माहिती असते. 

इंटरनेटच्या माध्यमातून हा कोड आपल्याला गरजेची माहिती देतो. मोबाईल किंवा कोणत्याही स्कॅनरच्या माध्यमातून हा कोड स्कॅन करता येतो. 

क्यूआर कोड हा बारकोडचं आधुनिक रुप समजला जातो. असं म्हटलं जातं की जपानमध्ये 1960 दरम्यान मोठमोठे सुपरमार्केट सुरु झाले. 

इथं खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. ज्यामुळं हिशोबासाठी असणाऱ्या व्यक्तीचे तीनतेरा वाजले. हातानं लेखी बिलं बनवून त्यांची मनगटं दुखू लागली. 

या समस्येवर तोडगा म्हणून बारकोड़ वापरात आणला गेला. 1974 मध्ये बारकोडच्या समस्येनं तोडगा तर काढला, पण वार वाढत गेला तशा त्यातील त्रुटीही समोर येऊ लागल्या. 

बारकोडमध्ये फक्त 20 आकडे किंवा अक्षरांइतकीच माहिती कींवा सुचना देता येत होती. पण, इतक्यावरच गरजा भागत नव्हत्या. 

पुढे जपानच्या डेंसो वेव कॉरपोरेशन या कंपनीनं ही समस्या पाहता काम सुरु केलं. वारंवार अपयशी होऊनही कंपनीनं माघार घेतली नाही. अखेर क्यूआर कोडचा जन्म झाला. 

मासाहिको हरा (Masahiko Hara) यांच्या नेतृत्त्वाखाली हे काम साध्य झालं होतं. 

क्यूआर कोड तयार करण्याचं श्रेय मासाहिको हरा (Masahiko Hara) यांना जातं. काम दहापट वेगानं करण्यासाठी मासाहिको यांच्या प्रयत्नांनी अनेकांचेच कष्ट वाचवले. 

 मासाहिको हरा ने बनाया क्यूआर कोड

पहिल्यांदाच या क्यूआर कोडचा वापर ऑटोमोबाइल, फार्मास्यूटिकल आणि रिटेल इंडस्ट्रीजमध्ये करण्यात आला होता. 

हल्ली तर सिनेमागृहांपासून ऑनलाईन पेमेंटपर्यंत प्रत्येक ठिकाणी, अगदीच काय तर रेस्तराँमध्ये ऑर्डर देण्यासाठीही या क्यूआर कोडचा वापर केला जातो. 

तुम्ही तुमचा क्यऊूआर कोडही बनवू शकता. धुळ - मातीचा यावर काहीच फरक प़डत नाही. क्यूआर कोडचा कागद फाटलेला असला तरीही तो सहजपणे स्कॅन केला जातो. आहे की नाही ही गंमत?