Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 16, 2023, 09:04 PM IST
Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या title=
Smartphones Mobile Cover

Smartphone Tips And Tricks : इंटरनेटच्या वेगवान युगात मोबाईल हा एक जीवनावश्यक घटक बनला आहे. आजकाल ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या माध्यमातून एका क्लिकवर होतं. मोबाईल नेहमी स्टायलिश दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळे मोबाईल कव्हर वापरतात. कोव्हिडच्या काळानंतर शिक्षणासाठी देखील सगळे लोक स्मार्टफोनकडे वळले आहेत. ज्यामुळेच हे फोन आता आपल्या आयुष्यातील अविभाज्या भाग असल्याचे बोलेलं जातंय.  काही फोन स्वस्त: असतात तर काही फोन हे महाग असतात. लोकं आपआपल्या गरजेनुसार फोन विकत घेतात. मात्र, कव्हरमुळे कोणची चमक आणखी वाढते.

मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

1. अनेक कंपन्या नवीन मस्त डिझाईनचे स्मार्टफोन बाजारात आणतात. दिसायला आकर्षक असण्यासोबतच ते महागही आहेत. परंतु एवढे पैसे देऊनही मोबाईल कव्हर लावल्यामुळे फोनचे डिझाईन लपवले जाते आणि लूक बाकीच्या मोबाईलसारखा सर्वसामान्य दिसतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, मोबाईल कव्हरशिवाय फोन खूपच स्टाइलिश आणि आकर्षक दिसतो.

2. स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे फोन गरम होतो. जर त्यात मोबाईल कव्हर लावले असेल, तर फोन खूप गरम होण्याची शक्यता असते. अति उष्णतेमुळे फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. परंतु प्रत्येक मॉडेल गरम होत नाही, पण काही मॉडेल्सवर मात्र याचा परिणाम होतो.

3. मोबाईला कव्हर न लावल्यामुळे आणि वेळेवर साफ न केल्याने फोनच्या मागील पॅनलमध्ये घाण साचते. ज्यामुळे अनेक फोनला स्क्रॅचेस देखील पडू लागतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही वेळोवेळी मोबाईल कव्हर साफ केले नाही तर फोनमध्ये घाण होणे आणि ओरखडे पडल्याने नुकसान होते.

दरम्यान, बाजारात अनेक प्रकारचे सिलिकॉन कव्हर उपलब्ध आहेत. सिलिकॉन कव्हर इतके मऊ आहे की इतर कोणतेही आवरण त्याच्या तुलनेत इतके मऊ असू शकत नाही. सिलिकॉन कव्हरची लवचिकता सर्वात जास्त असते. त्याचा वापर तुम्ही करू शकता.