close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खास ऑफर

रिलायन्स जियो,एअरटेल, व्होडाफोन कपन्यांनी टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी बाजारत आणला आहे. 

Updated: Mar 28, 2019, 05:22 PM IST
टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खास ऑफर

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबवत असतात. बाजारात रिलायन्स जियोने पाय ठेवल्यापासून बाकी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. एअरटेल, व्होडाफोन कंपन्यांसाठी मोठी स्पर्धा झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या प्लान्सच्या किमती कमी केल्या आहेत. आता बाजारात असे काही प्रिपेड प्लान्स आहेत जे ग्राहकांना कमी किमतीत जास्तीत-जास्त डेटा उपलब्ध करून देत आहे. तर या कपन्यांनी टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी बाजारत आणला आहे. 

एअरटेल टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान
एअरटेल कंपनीने  आपल्या ग्राहकांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे तीन टॉप-अप रिचार्ज ऑफर आणले आहेत. 29 रूपयांचा रिचार्ज केल्यास ग्राहकांना 520 MB एक्स्ट्रा डेटा देण्यात येणार आहे. 48 रूपयांच्या रिचार्ज केल्यास ग्राहकांना 1 GB एक्स्ट्रा डेटा  उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे 98 रूपयांच्या रिचार्ज केल्यास ग्राहकांना 3 GB डेटा अतिरिक्त मिळेल. 

व्होडाफोन टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान
एअरटेल प्रमाणेच व्होडाफोनने सुद्धा त्यांच्या ग्राहकांसाठी टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे. व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी 27 रूपयांमध्ये 28 दिवसांसाठी 450 MB डेटा देण्यात येणार आहे. 49 रूपयांमध्ये 1GB एक्स्ट्रा डेटा  ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 98 रूपयांमध्ये 28 दिवसांसाठी 3GB एक्स्ट्रा डेटा  उपलब्ध होणार आहे.

रिलायन्स जियो टॉप-अप डेटा रिचार्ज प्लान
जिओने ग्राहकांसाठी 11 रूपये, 21 रूपये आणि 51 रूपयांचे  टॉप-अप प्लान बाजारात आणले आहेत. 11 रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 400 MB अतिरीक्त डेटा ऑफर केले जाणार आहे. 21 रूपयांच्या प्लानमध्ये 1 GB आणि 51 रूपयांच्या प्लानमध्ये 3GM एक्स्ट्रा डेटा देण्यात येणार आहे.