Portable Generator : लोडशेडिंगमुळे (Load Shedding) अजुनही ग्रामीण भागात अजूनही दररोज 2-4 तास वीज जाते. यामुळे घरातली अनेक कामं रखडतात. इतकंच नाही तर टीव्ही, पंखे यासारखी उपकरणंही वापरता येत नाही. अशावेळेस पावर सोर्स नसल्यास अनेक अडचणी येतात. वीज गेल्याने घरातील मुलांच्या अभ्यासातही व्यत्यय येतो. उन्हाळ्यात तर लोडशेडिंगमुळे जीव नकोसा होतो. मात्र या लोडशेडिंगपासून तु्म्हाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही सोलर पावर जनरेटर आणला आहे. या जनरेटरने अनेक तास घरातील उपकरणं चालवू शकता. (sr portables solar generator will chaged all devices in your home know features and price)
एसआर पोर्टेबल्स सोलर (SR Portables Solar Aisa) असं या जनरेटरचे नाव आहे. हा जनरेटर तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. याची किंमत 17 हजार 999 रुपये आहे. हा जनरेटर आकाराने खूपच लहान आहे. या जनरेटर सोबत एक हँडल मिळेल ज्यामुळे उचलून कुठेही नेऊ शकता. जनरेटरचं वजन खूप कमी आहे. त्यामुळे ते कुठेही वापरता येतं.
या पोर्टेबल सोलर जनरेटरच्या मदतीने 25 तासांपर्यंत एलईडी बल्ब लावू शकता. रेफ्रिजरेटर 3 तास चालवू शकतो. एक टेबल फॅन 2 तासांपेक्षा जास्त काळ वापरु शकतो. तसेच स्मार्ट एलईडी टीव्ही 3 तासांपेक्षा जास्त काळ चालवू शकता. 4 तासांपेक्षा जास्त काळ लॅपटॉप चार्ज करता येईल. इतकंच नाही तर 10 पेक्षा जास्त वेळा ड्रोन चार्ज करू शकता. एकूणच घरातील उपकरणांना उर्जा देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे एक दमदार प्रोड्क्ट आहे.