नवी दिल्ली : स्वाईप टेक्नॉलॉजीने अजून एक स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला. स्वाईप इलीट प्रो (swipe elite pro) असे या फोनचे नाव आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये ३जीबी रॅम असून याची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे. सध्या हा फोन स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे 4G VoLTE या फोनमध्ये सपोर्ट करत असून यात ३२जीबी इंटरनल मेमरी आहे.
६९९९ रुपये किंमतीच्या या फोनमध्ये ३जीबी रॅम सोबत फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. ड्युअल सिम असलेला हा फोन ६.० मार्शमेलो अॅनरॉईड आहे. जाणून घेऊया या फोनचे फीचर्स...
डिस्प्ले आणि प्रोसेसर :
या स्मार्टफोनमध्ये ७२०x१२८० पिक्सल असलेला ५.० इंच डिस्प्ले आहे. त्याचबरोबर १.४ गीगा हर्ट्सचा क्वाड-कोर प्रोसेसर आहे.
रॅम :
३ जीबी रॅम सोबत २५०० mAh ची बॅटरी आहे. इतर फीचर्सच्या तुलनेत यात बॅटरी कमी आहे.
कॅमेरा :
स्वाईपच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असून ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.