Tataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स

Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition:  टाटा मोटर्सनेही  ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.

Updated: Aug 27, 2022, 03:25 PM IST
Tataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स   title=

मुंबई : Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition: सणासुदीच्या निमित्ताने, कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादने आणि ऑफर लॉन्च करतात. टाटा मोटर्सनेही याच योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. 

टाटा मोटर्सने Harrier, Safari, आणि  Nexonच्या जेट आवृत्त्या लॉन्च केल्या आहेत. जेट एडिशन आता या तीन कारचे टॉप व्हेरियंट असणार आहे. नवीन व्हेरियंटमध्ये कारचा लूक तर बदलण्यात आला आहे. यामध्ये ब्राँझ बॉडी कलर आणि प्लॅटिनम सिल्व्हर रूफ देण्यात आले आहे. इंटीरियरला ड्युअल टोन कलर देखील मिळतात. याशिवाय तिन्ही कारच्या जेट एडिशनमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  

कारची किंमत काय आहे?

Tata Nexon Jet Editionची किंमत  12.78 लाख रुपयांपासून सुरु होते आणि  13.43 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टाटा Harrierची जेट एडिशन फक्त दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - XZ+ आणि XZA+. त्यांची किंमत अनुक्रमे 20.90 लाख रुपये आणि 22.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याचप्रमाणे, टाटा सफारीच्या जेट एडिशनची किंमत 21.45 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 22.65 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) जाते.

टाटा नेक्सॉन जेट एडिशन

टाटा नेक्सॉन जेट एडिशनची वैशिष्ट्ये टाटा नेक्सॉनची जेट एडिशन स्टँडर्ड XZ व्हेरियंटवर आधारित ठेवण्यात आली आहे. यामध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, ऑटो डिमिंग IRVM, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, टिल्ट फंक्शनसह इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो हेडलॅम्प्स, हरमन आणि iRA कनेक्टेड कार टेक कडून 7-इंच फ्लोटिंग डॅश-टॉप टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. 

यात दोन इंजिन पर्याय मिळतील - 1.2-लिटर टर्बो पेट्रोल (120 पीएस आणि 170 एनएम) आणि 1.5-लिटर टर्बो डिझेल मोटर (110 पीएस आणि 160 एनएम). दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. Nexon ला तीन ड्राइव्ह मोड मिळतात - Eco, City आणि Sport.  

Tata Harrier आणि  Safari Jet  एडिशनची वैशिष्ट्ये

केबिनचा लूक सुंदर करण्यात आलाय. दोन्ही जेट आवृत्त्यांमध्ये वायरलेस चार्जिंग, नवीन लेदर सीट्स, ऑटो डिमिंग ओआरव्हीएम, पॅनिक ब्रेकिंग अलर्ट, ब्लॅक कलर डायमंड कट अॅलॉय, चालकासाठी व्हेंटिलेटेड आणि को-ड्राइव्ह सीट्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये एअर प्युरिफायर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, iRA कनेक्टेड कार टेक, पॅनोरॅमिक सनरुफ आणि 8.8-इंचाचा डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही वाहनांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.